IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेकडून अटक, 3 पिस्टल 5 काडतुसे जप्त

by sachinsitapure

पिंपरी :  – Pune Pimpri Chinchwad Crime News | बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाने (Pimpri Chinchwad Crime Branch) अटक करुन तीन पिस्टल व पाच काडतुसे जप्त केली आहेत (Pistol Seized) . ही कारवाई गुन्हे शाखा युनिट पाच (Pimpri Chinchwad Crime Branch) व तीन च्या पथकाने तळेगाव दाभाडे (Talegaon Police Station) व आळंदी पोलीस ठाण्याच्या (Alandi Police Station) हद्दीत मंगळवारी (दि.30) केली आहे. या कारवाईत एक लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 80 हजार रुपये किमतीचे दोन गावठी पिस्टल आणि 4 हजार रुपये किमतीचे 4 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई मंगळवारी (दि.30) रात्री साडे बाराच्या सुमारास नथुभाऊ भेगडे शाळेच्या पाठीमागे करण्यात आली.

याबाबत साहिल उर्फ बाबा लक्ष्मण शिंदे (वय-23 रा. यशवंतनगर प्लॅस सोसायटी, तळेगाव स्टेशन), महेश मुकुंद शिंदे (वय-27 रा. नाथुभाऊ भेगडे शाळेच्या मागे, एंजल हिल्स सोसायटी, तळेगाव दाभाडे) यांच्यावर आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार दत्तात्रय मारुती बनसुडे यांनी फिर्याद दिली आहे.

गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरकळ ते तुळापुर रोडवरून एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि एक काडतूस असा एकूण 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गणेश तुकाराम पवार (वय-25 रा. मरकळ ता. खेड) याला अटक केली आहे. याबाबत पोलीस शिपाई योगेश्वर औदुंबर कोळेकर (वय-32) यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Pune Lok Sabha | वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालयाला निरीक्षकांची भेट

Related Posts