IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : ‘तुने गलत लडकी से दोस्ती की’ म्हणत तरुणाला जत्रेत मारहाण, अल्पवयीन मुलासह तिघे ताब्यात

by sachinsitapure

पिंपरी :  – Pune Pimpri Chinchwad Crime News | जत्रेत फिरायला गेलेल्या तरुणाला ‘तुझे लडकीसे दोस्ती करने का बहोत शौक है, पर तुने लगत लडकी से दोस्ती की, आज तुझे जिंदा नही छोडुंगा’ असे म्हणून बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सोमवारी (दि.24) रात्री आठच्या सुमारास जाधववाडी चिखली (Jadhavwadi Chikhali) येथील विठ्ठल मंदीराच्या समोर घडला. याप्रकरणी चिखली पोलिसांनी (Chikhali Police Station) एका अल्पवयीन मुलासह तिघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत सनी प्रविण मौर्य (वय-18 रा. राघवेंद्र सोसायटी, शाहुनगर, चिंचवड) याने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कमलेश उर्फ नन्या क्षिरसागर (वय -23 रा. कुळवाडी चिखली मुळ गाव मु.पो. हाळगांव ता. कराड जि. सातारा), एजाज उर्फ अज्जु गणी शेख (वय-20 रा. बालघरे वस्ती, चिखली) यांना अटक केली आहे. तर 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर आयपीसी 307, 324, 323, 34 आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जत्रेत जाण्यासाठी विठ्ठल मंदीरासमोर घरच्या लोकांची वाट पाहात थांबला होता. त्यावेळी दोन मोटारसायकल वरुन त्याच्या तोंडओळखीचे आरोपी आले. आरोपींनी सनी याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी जत्रेत आलेले लोक सनीला मदत करण्यासाठी आले असता एजाज शेख याने हातातील चाकू हवेत फिरवून ‘आम्ही इथले भाई आहोत, आमच्यामध्ये यायचे नाही, नाहीतर ऐका-ऐकाला खल्लास करील’ असे बोलून दहशत निर्माण केली. तसेच आरोपी नन्या आणि अल्पवयीन मुलाने लाथा बुक्क्यांनी आणि लाकडी फळीने बरगडीवर, डोक्यात मारहाण करुन जखमी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts