IMPIMP

Rape Case Pune | पुणे : शेतमजुराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

by sachinsitapure

पुणे :  – Rape Case Pune | शेतात काम करणाऱ्या शेतमजुराच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जमीन मालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पारगाव कारखाना पोलिसांनी (Pargaon Karkhana Police Station) जमीन मालकावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नगापूर गावच्या हद्दीत दहा ते पंधरा दिवसांपूर्वी दुपारी दीडच्या सुमारास घडला.

याप्रकरणी पिडीत मुलीने पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार घनश्याम हरिदास निकम (रा. नागापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर शेतमजूर कुटुंब नगापूर गावच्या हद्दीत निकम यांच्या शेतातमधील खोलीत राहत होते. पिडीत मुलीचे कुटुंबीय आरोपीच्या शेतात काम करत होते.

घनश्याम निकम याने दहा ते पंधरा दिवसांपूर्वी नागापूर गावच्या हद्दीतील शेतातील खोलीमध्ये दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुलीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. मुलीने त्याला प्रतिकार केला, तरीही निकम याने तिच्यावर अत्याचार केला. पिडीत मुलीने याबाबत घरच्यांना सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पिडीत मुलींच्या पालकांनी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात जाऊन घनश्याम निकम याच्या विरुद्ध तक्रार दिली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील करीत आहेत.

Related Posts