IMPIMP

ST Driver Suicide | एसटी चालकाची बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या, परिसरात खळबळ

by nagesh
Solapur Crime | st-strike the father went to the st movement and thechild strangled his mother with his sari

लातूर : सरकारसत्ता ऑनलाइन –  ST Driver Suicide | लातूरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका एसटी कर्मचाऱ्याने थेट बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (ST Driver Suicide) केली आहे. पगार वेळेवर मिळत नसल्याने या तणावातून ही आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होतो आहे. या घटनेमुळे एसटी महामंडळासह परिसरात खळबळ उडाली आहे. संजय रामराव केसगिरे (Sanjay Ramrao Kesgire) असं मृत एसटी चालकाचे नाव आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याबाबत माहिती अशी, संजय रामराव केसगिरे (Sanjay Ramrao Kesgire) यांनी गळफास लावून घेतल्याचे पाहताच बस स्थानकातील
इतर कर्मचाऱ्यांनी केसगिरे यांना तात्काळ उदगीर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरानी त्यांना तपासून मृत घोषित केले आहे.
दरम्यान, वेळेवर वेतन मिळत नसल्याने केसगिरे आर्थिक विवंचनेत होते.
या तणावातून त्यांनी आत्महत्या (ST Driver Suicide) केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
संजय केसगिरे यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी आज अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

दरम्यान, नुकतंच काही दिवसापुर्वी उदगीर बस स्थानकात एका एसटी चालकाने (MH-14 BT 2160)
या क्रमांकाच्या एसटीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या घटनेवरुन सर्वत्र खळबळ उडाली असतानाच आज आणखी एक घटना लातूर मध्ये घडली आहे.
या घटनेमुळे महामंडळात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी अधिक तपास उदगीर पोलीस (Udgir police) करीत आहे.

 

Web Title : ST Driver Suicide | fed up with financial situation st employee committed suicide by strangulation latur news

 

हे देखील वाचा :

Maha Vikas Aghadi | लखीमपूर खेरी प्रकरणावरुन महाविकास आघाडीकडून 11 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

Vehicle Scrappage Policy | जुन्या वाहनांच्या रजिस्ट्रेशनचं नुतनीकरण करणं होणार महाग, द्यावे लागणार 8 पट जास्तीचे पैसे, जाणून घ्या

Railway Recruitment 2021 | 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! रेल्वेमध्ये तब्बल 4103 जागांसाठी भरती, जाणून घ्या

 

Related Posts