IMPIMP

Suicide Case | महिला बँक मॅनेजर आत्महत्या प्रकरण ! IPS आशीष तिवारीसह 3 जणांवर FIR

by nagesh
Suicide Case | ayodhya fir against ips officer ashish tiwari and 3 others in pnb bank manager suicide case of ayodhya

अयोध्या : वृत्तसंस्था–  Suicide Case | रामगरी अयोध्या (Ayodhya) मध्ये पीएनबी बँकेच्या महिला मॅनेजरीच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी आयपीएस अधिकारी आणि अयोध्याचे माजी एसपी आशीष तिवारी यांच्यासह तीन लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारावर आयपीएस आशीष तिवारी (ips officer ashish tiwari), हेडकॉन्स्टेबल अनिल रावत आणि विवेक गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल (Suicide Case ) केला आहे.

 

वडीलांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

 

मागच्या शनिवारी अयोध्यामध्ये पीएनबी बँकेच्या महिला मॅनेजरने आपल्या घरात आत्महत्या केली होती.
बँक मॅनेजरच्या वडीलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
तर अयोध्याचे पोलीस अधीक्षक शैलेष पांडे यांनी सांगितले की, कुटुंबियांच्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोस्टमार्टमनंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सोपवण्यात आला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सुसाईड नोटमध्ये दोन पोलिसांची नावे

 

अयोध्यामध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या सहानगंज शाखेच्या उप व्यवस्थापक श्रद्धा गुप्ता यांनी शनिवारी आपल्या भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Case) केली.
घटनास्थळावरून एक सुसाईड नोट मिळाली आहे, ज्यामध्ये दोन पोलीस कर्मचार्‍यांना यासाठी जबाबदार ठरवले आहे.

 

पीएनबी (PNB) बँकेत करत होती नोकरी

 

सुसाईड नोट जप्त केल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरूवात केली होती.
श्रद्धा गुप्ता मुळची लखनऊची राहणारी होती. मागील 5 वर्षांपासून अयोध्यामध्ये पीएनबी बँकेत कार्यरत होती.

 

विवेकमुळे तुटले नाते

 

एक वर्षापूर्वी श्रद्धाचा विवाह बलरामपुरच्या उतरौला येथील रहिवासी विवेक गुप्ताबरोबर ठरला होता.
चिनहट परिसरात बीबीडीजवळ दयाल रेसीडन्सीत राहणारा विवेक त्यावेळी लखनऊ येथील एचसीएलमध्ये नोकरी करत होता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

विवाह मोडल्यानंतर त्रास देऊ लागला

 

विवेकचे वर्तन वाईट होते. अनेक तरूणींशी त्याची मैत्री होती, ज्यांचे त्याच्या घरी येणे-जाणे होते.
आणखी काही समजल्यानंतर विवेकसोबतचा श्रद्धाचा विवाह मोडण्यात आला होता. परंतु तो श्रद्धाला त्रास देत होता.

 

पोलीस अधिकार्‍यांच्या नावाने धमकावत होता

 

मृताचा भाऊ शुभम गुप्ताचा आरोप आहे की विवेक गुप्ता बहिण श्रद्धासह संपूर्ण कुटुंबाला त्रास देत होता.
समजावून सांगितले तरी त्याच्यात सुधारणा झाली नव्हती. तो पोलीस अधिकार्‍यांचे नाव घेऊन धमकावत होता.

 

विवेक म्हणत असे की, त्याचे कुणीही काहीही वाकडे करू शकत नाही.
शुभमचा आरोप आहे की, विवेकला काही पोलीस कर्मचारी मदत करत होते, यामुळेच तो गुंडगिरी करत होता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Suicide Case | ayodhya fir against ips officer ashish tiwari and 3 others in pnb bank manager suicide case of ayodhya

 

हे देखील वाचा :

Mumbai Drugs Case | नवाब मालिकांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर ‘निशाणा’; अमृत फडणवीस यांचा फोटो शेअर करत केला ड्रग पेडलरसोबत ‘कनेक्शन’ असल्याचा आरोप

Anti Corruption Bureau Pune | 1 लाखाचे लाच प्रकरण ! पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची (ACB) वडगाव मावळमध्ये मोठी कारवाई; प्रचंड खळबळ

LPG Price 1 Nov | ‘एलपीजी’ सिलेंडर 265 रुपयांनी महागला, दिवाळीपूर्वीच फुटला महागाईचा ‘बॉम्ब’

 

Related Posts