IMPIMP

Anti Corruption Bureau Pune | 1 लाखाचे लाच प्रकरण ! पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची (ACB) वडगाव मावळमध्ये मोठी कारवाई; प्रचंड खळबळ

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Anti Corruption Bureau Pune | मावळ तालुक्यातील साते गावात भंगार दुकानाच्या ना हरकत परवान्यासाठी १ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Pune) ग्रामपंचायत सदस्याला रंगेहाथ पकडले. मात्र, सरपंच फरार झाला आहे. ऋषीनाथ आगळमे असे अटक केलेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. दोघांविरुद्ध वडगाव मावळ पोलीस ठाण्यात (Wadgaon Maval Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

तक्रारदाराने साते गावात भंगाराचे दुकान सुरु केले होते. त्याच्याविरुद्ध  ग्रामपंचायतीत तक्रार केली. तेव्हा सरपंचाने या तक्रारदाराला बोलावून तू दुकान सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नाही. तेव्हा तक्रारदार यांनी ग्रामपंचायतीकडे ना हरकत परवान्यासाठी अर्ज केला. तेव्हा सरपंचाने ना हरकत परवान्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागितली. त्यावर तक्रारदारांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Pune) धाव घेतली. या तक्रारीची पडताळणी करताना त्यांनी तडजोड करुन १ लाख रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानुसार रविवारी दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.

ऋषीनाथ आगळमे हा ग्रामपंचायत सदस्य लाचेची रक्कम घेण्यासाठी आला. तेव्हा तक्रारदाराकडून १ लाख रुपये स्वीकारताना त्याला पकडण्यात आले.
त्याची चारचाकी गाडीही जप्त करण्यात आली. याची कुणकुण लागताच सरपंच मात्र फरार झाला आहे. वडगाव मावळ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Anti Corruption Bureau Pune | ACB Trap wadgaon maval sate gaon grampanchayat member and sarpanch one lakh

 

हे देखील वाचा :

LPG Price 1 Nov | ‘एलपीजी’ सिलेंडर 265 रुपयांनी महागला, दिवाळीपूर्वीच फुटला महागाईचा ‘बॉम्ब’

Petrol Diesel Price Pune | सलग सहाव्या दिवशी ‘पेट्रोल-डिझेल’च्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Sore Throat | हिवाळ्यात वाढली घशात ‘खवखव’, तर ‘या’ 9 देशी वस्तूंनी मिळेल ताबडतोब आराम; जाणून घ्या

 

Related Posts