IMPIMP

Uruli Kanchan Pune Crime News | पुणे : घरी बोलवून घेऊन योगा शिक्षकाकडून विद्यर्थिनीचा विनयभंग

by sachinsitapure

पुणे : Uruli Kanchan Pune Crime News | बारावीची परीक्षा दिलेली 18 वर्षीय तरुणी तिच्या आई-वडिलांकडे सुट्टीसाठी उरुळी कांचन परिसरात आली होती. तिच्या घरा शेजारी राहणाऱ्या एका योगा शिक्षकाने (Yoga Teacher) मुलीला घरी बोलावून घेत तिच्यासोबत असभ्य वर्तन करुन तिचा विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन उरुळी कांचन पोलीस ठाण्यात (Uruli Kanchan Police Station) योगा शिक्षक भूज्जूलाल रायकवार याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.7) घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळावारी पीडित मुलीचे आई-वडील कामावर गेले होते. तर तिचा भाऊ शेजारी फोनवर बोलत होता. त्यावेळी शेजारी राहणारा रायकवार सकाळी दहाच्या सुमारास मुलीच्या घरी आला.

आरोपीने मुलीला विचारले की तुला योगासने येतात का? यावर तिने नाही असे सांगितले. त्यानंतर आरोपीने पीडितेच्या घरी जाऊन त्या मुलीला पद्मासन, सुखासन, सिद्धासन हे योगासने शिकवली व दोन योगासनांची माहिती असलेला कागद दिले व त्याच्या घरी गेला. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास परत योगा शिक्षकाने त्या मुलीच्या घरी जाऊन दिलेले दोन योगासनांचे कागद घेऊन माझ्या घरी ये, असे सांगितले. त्यानुसार पीडित मुलगी त्याच्या घरी गेली असता त्याने तिच्यासोबत गैरवर्तन करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Kondhwa Pune Police News | पुणे : सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक, कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप

Related Posts