IMPIMP

Yerawada Pune Crime News | पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

by sachinsitapure

पुणे : Yerawada Pune Crime News | पतीचे बाहेरील महिलांसोबत असलेले अनैतिक संबंध (Immoral Relationship) आणि त्याच्याकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने गळफास (Hanging Case) घेऊन आत्महत्या (Suicide Case) केली. हा प्रकार येरवडा येथील नागपुर चाळीत मंगळवारी (दि.7) सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. मोनीका मधुकर ओव्हाळ (वय-38) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.

याबाबत प्रशांत सुरेश चाबुकस्वार (वय-31 रा. नागपुर चाळ, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन मधुकर लक्ष्मण ओव्हाळ (वय-45 रा. नागपुर चाळ) याच्यावर आयपीसी 306 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मधुकर याचे इतर महिलांसोबत अनैतिक संबंध होते. आरोपी फिर्य़ादी यांच्या बहिणीला वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देत होता. पतीच्या त्रासाला वैतागून फिर्यादी यांच्या बहिणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आरोपी पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts