IMPIMP

प्रसिध्द बंगाली अभिनेत्री श्राबंती चटर्जी यांचा भाजपात प्रवेश

by sikandershaikh
bengali-actor-srabanti-chatterjee

कोलकाता : वृत्तसंस्थापश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. एकीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा यांचा गड वाचवण्याकडे कल आहे. तर दुसरीकडे भाजपने येथे बॅनर्जी यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. क्रिकेटपासून फिल्मी जगतातील अनेकांना पक्षात सामावून घेण्यात भाजपला यश येत आहे. त्यातच पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्राबंती चटर्जी (srabanti chatterjee) यांनी सोमवारी (दि.1) भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील प्रघातानुसार यंदाही निवडणुका तारांकित होण्याची चिन्हे दिसत आहेत.

पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि पक्षाचे निवडणूक प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत अभिनेत्री श्राबंती चटर्जी (srabanti chatterjee) यांचा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे आता भाजपाकडून त्यांना विधानसभेचे तिकीट मिळणार की त्या स्टार प्रचारक म्हणून काम करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. श्राबंती चटर्जी या बंगालमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दरम्यान, यंदाही पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या तोंडावर राजकारणात कलाकारांची एन्ट्री होताना दिसत आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला आहे.

Pooja Chavan Suicide Case : पूजा चव्हाण प्रकरणी गूढ अखेर  शवविच्छेदन अहवालातुन उघडलं

पेट्रोलची ‘शंभरी’ आणि गॅसची ‘हजारी’, जनतेकडून ‘कोहळा’ काढायचा नंतर थोड्या दरकपातीचा ‘आवळा’ टेकवायचा; शिवसेनेनं मोदी सरकारला धरले धारेवर; कशासाठी जनतेच्या जिवाशी खेळ ?

Jamai 2.0 Web Series मध्ये परफेक्ट बिकिनी बॉडीसाठी निया शर्मानं 2 दिवस केलं होतं ‘हे’ काम ! अभिनेत्रीनं केला खुलासा (Photos)

Related Posts