IMPIMP

Supriya Sule-Ravindra Dhangekar | … म्हणून ते ट्रोल करत आहेत, रवींद्र धंगेकरांना शिक्षणावरुन ट्रोल करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचं सडेतोड उत्तर (Video)

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Supriya Sule-Ravindra Dhangekar | वीज दरवाढीच्या (Electricity Price Hike) विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar NCP) पक्षाकडून पुण्यात सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले (Mahavikas Aghadi Protest). या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर झालेल्या ट्रोलिंग संदर्भात प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी राज्याची परिस्थिती आणि दुष्काळावर भाष्य केलं.

रवींद्र धंगेकर यांना शिक्षणावरुन ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, विरोधकांनी रवींद्र धंगेकर यांना त्यांच्या शिक्षणावरुन ट्रोल केलं. असं ट्रोल करणं चांगलं नाही मात्र रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात भाजपाला बोलायला काहीच नाही, म्हणून ते ट्रोल करत आहेत.

लोकांना आता बदल हवाय

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, लोकांना या देशांमध्ये बदल हवाय, भ्रष्टाचाराला लोक थकले आहेत आणि कंटाळले आहेत. बेरोजगारीला कंटाळले आहेत, महागाईला कंटाळले आहेत आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात, कामगारांच्या विरोधात महिलांच्या विरोधातील आहे. त्यामुळे लोकांना आता बदल हवाय. हा बदल घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

दुष्काळासंदर्भात हे असंवेदनशील

राज्यामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघात पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. धरणात पाणी नाही. दुष्काळासाठी मला काम करायचं आहे. दुष्काळासंदर्भात हे असंवेदनशील आहे. दुष्काळाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे मी राजकारणापेक्षा दुष्काळाकडे लक्ष देत आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सामान्य जनतेला वीज दरवाढीचा ‘शॉक’

महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील सामान्य जनता आजपर्यंतच्या सर्वाधिक महागाईचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत जनतेला महागाईच्या संकटातून दिलासा देण्यासाठी धोरण आखणे हे सरकारचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्रातील फडणवीस – पवार – शिंदे सरकारने मात्र आधीच महागाईच्या चटक्यांनी पोळलेल्या जनतेला वीज दरवाढीचा शॉक दिला आहे. विजेचा किमान स्थिर आकार तसेच प्रति युनिट वीज दर यात वाढ करून फडणवीस – पवार – शिंदे सरकारने एकूण वीज दरात सरासरी १५% वाढ केली आहे, असे आरोप सुप्रिया सुळेंनी केले आहेत.

Police Personnel Suspended In Pune | आमदार महेश लांडगे यांच्याशी गैरवाजवी भाषा, पोलीस कर्मचारी निलंबित

Related Posts