IMPIMP

Coronavirus Patient |फुफ्फुसांची होतेय समस्या ! कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची वाढली चिंता

by omkar
Corona Patient

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – coronavirus patient मुंबईत कोरोना व्हायरसमधून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची संख्या वाढल्याने डॉक्टरांची चिंता वाढली आहे. परंतु अशा रूग्णांच्या नावाची नोंद राज्य सरकार आपल्या करून घेत नाही. तज्ज्ञ सांगतात की, असे रूग्ण ज्यांना 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये काढले आहेत किंवा ज्यांना कोरोना व्हायरसची गंभीर लक्षणे होती (coronavirus patient) , ते पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा धोका सर्वात जास्त आहे.

Horoscope 14 june 2021 | 14 जून राशीफळ : आज पुष्ययोग, ‘या’ 7 राशींना होणार धनलाभ, इतरांसाठी असा आहे सोमवार

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

केईएम हॉस्पिटलचे माजी डीन आणि राज्य सरकारच्या कोरोना कार्यकारी दलाचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी म्हटले की, कोरोना व्हायरसच्या नवीन रूग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. परंतु आजारातून बरे झालेले रूग्ण पुन्हा दाखल होण्याची प्रकरणे वाढत आहेत, विशेषता ज्येष्ठ. एका डॉक्टरांनी सांगितलजे की, 76 वर्षाच्या ज्येष्ठाला संक्रमित झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, येथे 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते, ही व्यक्ती तेलंगना येथील आपल्या घरी पोहचल्यानंतर त्यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, परंतु काही दिवसानंतर फुफ्फुसांमध्ये गंभीर सूज आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

30 जूनपूर्वी करून घ्या ‘ही’ 5 अतिशय महत्वाची कामे अन्यथा लागेल मोठा दंड, सोबतच बँक खाते आणि PAN कार्ड होईल बंद

असे रूग्ण जास्त कमजोर किंवा अतिसंवेदनशील असतात, ज्यांना कोरोनातून बरे झाल्यानंतर घरीदेखील महिनाभरापर्यंत ऑक्सीजनची आवश्यकता असते.
मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये पोस्ट-कोविड क्लिनिकमध्ये मे महिन्यात असे 170 नवीन रूग्ण आढळले आहेत.
फोर्टिस हॉस्पिटलच्या संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अनीता मॅथ्यू यांनी म्हटले, सार्स-सीओव्ही -2 व्हायरस शरीरात ऊतींच्या एका मोठ्या साखळीला संक्रमित करतो.
याच्या प्रभावामुळे संसर्गाच्या अनेक महिन्यानंतर, काही कोविड रूग्णांमध्ये लक्षणांची संख्या आश्चर्यचकित करणारी आहे.

मुंबई : 11 दिवसातच झाला महिनाभरा इतका पाऊस, IMD ने रविवारपर्यंत जारी केला हाय अलर्ट

अनीता मॅथ्यू यांनी म्हटले, पोस्ट कोविड क्लिनिकमध्ये येणार्‍या प्रत्येक 100 रूग्णांमध्ये किमान 70 लोकांमध्ये मोठ्या कालावधीपर्यंत काही लक्षणे आढळतात.
यासोबतच त्यांनी म्हटले, यापैकी जवळपास 20% गंभीर लक्षणांचे असतात ज्यांच्यावर ताबडतोब लक्ष देण्याची गरज असते.

सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ ! 23 वेळा वाढले पेट्रोल डिझेलचे भाव, जाणून घ्या नवे दर

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : Lung problems! Patients recovering from corona are re-admitted to the hospital, raising concerns among doctors

Related Posts