IMPIMP

MG Road Pune Accident | पुण्यातील एम.जी. रोडवर अपघात, अलिशान गाडीने अनेक वाहनांना उडवलं

by sachinsitapure

पुणे :  – MG Road Pune Accident | पुण्यात अपघाताचं प्रमाण वाढत आहे. त्यातच वाहनांचा वेग या अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात एका अलिशान चार चाकी गाडीने अनेक गाड्यांना धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. हा अपघात सर्वात जास्त रहदारी असलेल्या एम.जी. रोड जवळ झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एम.जी. रोडवर कारला भीषण अपघात झाला. भरधाव कारने सात ते आठ वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये साते आठ वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला आहे. त्याला जहांगिर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, एक चार चाकी पुण्यातील एम.जी. रोड जवळील एका रस्त्यावरुन जात होती. गाडी चालवत असताना त्या चालकाला अचानक फिट आली आणि त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि समोर असलेल्या सात ते आठ गाड्यांना धडक बसली. या अपघातात एकजण किरकोळ जखमी झाला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सगळ्या गाड्यांची पाहणी करत आहेत. मात्र, यात गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अनेक चालक संतापलेले आहेत. अपघातानंतर बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Rape Case Pune | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

Related Posts