IMPIMP

Kolhapur Crime | अपत्य प्राप्तीसाठी नराधमाने डॉक्टर मित्राच्याच 7 वर्षाच्या मुलाचा दिला बळी! थरकाप उडवणारी घटना

by nagesh
Pune Crime | Gangsters kill youth for not returning betting money; Incident in Ambegaon

कोल्हापुर : सरकारसत्ता ऑनलाइन Kolhapur Crime | अतिशय भयंकर आणि थरकाप उडवणारी घटना कोल्हापुरातील (Kolhapur Crime) सावर्डे बुद्रुक (ता. कागल) येथे घडली आहे. अपत्य प्राप्तीसाठी एका नराधमाने अवघ्या सात वर्षाच्या चिमुरड्याचा गळा चिरून नरबळी दिला. विशेष म्हणजे मृत बालकाच्या वडिलांच्या मित्रानेच हे कृत्य केले आहे. या घटनेनंतर प्रचंड संताप उसळला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

वडिलांचा मित्रच निघाला मारेकरी
वरद रवींद्र पाटील (7, रा. सोनाळी, ता. कागल) असे मृत बालकाचे नाव आहे. संशयित आरोपी मारुती तुकाराम वैद्य याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गावात लोकांमध्ये संताप असल्याने प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. घटनेनंतर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

17 ऑगस्ट रोजी रात्री सावर्डे बुद्रुक, कागल येथून आजोबांच्या घरातून वरद गायब झाला होता. आज (शुक्रवार) सकाळी वरदचे आजोबा दत्तात्रेय शंकर महातूगडे (रा. सावर्डे बुद्रुक, ता. कागल) यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर गावच्या तलावात वरदचा मृतदेह आढळून आला. हे वृत्त सर्वत्र पसरताच जमाव संतप्त झाला होता. यानंतर पोलिसांनी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

वरदचे आजोबांनी बांधलेल्या नवीन घराच्या वास्तूशांतीसाठी वरदचे वडील डॉक्टर रवींद्र पाटील आणि वरदची आई वरदसह सावर्डे येथे आले होते. घरात दिवसभर वास्तूशांतीचा कार्यक्रम सुरूहोता, याच दरम्यान रात्री आठ वाजताच्या सुमारास वरद गायब असल्याचे लक्षात आले.

यानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू झाली.
शोध घेवूनही वरद न सापडल्याने अखेर मुरगूड पोलीस ठाण्यात (Murgud police station) गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर पोलिसांनीही मुरगूड, कागल, कोल्हापूर आणि कर्नाटकातही मुलाचा शोध घेतला, परंतु तो सापडला नाही.

आज सकाळी गावातील तलावात वरदचा मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली.
वरदच्या मृदेहावर जखमांचे व्रण असून अमानुष मारहाण करून त्याचा खून झाल्याचे पोलिसांना दिसून आले.
यामुळे हा नरबळीचा प्रकार असल्याची शक्यता वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी वर्तवली आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

Web Title :- kolhapur Crime | murder of doctor friend’s 7 years old son

 

हे देखील वाचा :

Thane Crime Branch Police | जन आशीर्वाद यात्रेत खिसे कापणारी मालेगावची टोळी अटकेत; लाखोंचा ऐवज हस्तगत

BHR Scam | बीएचआरमध्ये ‘टेंडर’ भरणार्‍या अनेक व्यक्ती मुख्य आरोपीच्या ओळखीच्या; सुनील झंवरच्या कोठडीत वाढ

Pune Crime Branch Police | सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल व काडतुस जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

 

Related Posts