IMPIMP

7th Pay Commission | खुशखबर ! मोदी सरकारकडून सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त मोठं गिफ्ट; DA 3% नी वाढवला

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission big announcement in august da hike due da arrears and pf interest rate

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत (cabinet meeting today) केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 3 टक्के महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) वाढ मंजूर करण्यात आली. या निर्णयाचा फायदा केंद्रातील 47.14 लाख कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. हा नवीन महागाई भत्ता जुलै 2021 पासून लागू (7th Pay Commission) होईल.

महागाई वाढल्यामुळे केंद्र सरकारने डीए वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या दरवाढीमुळे आता आता डीए 28 टक्क्यांवरून (DA Hike News Today) वाढून 31 टक्के झाला आहे.
अशी माहिती खर्च विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने (7th Pay Commission) दिली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

यापूर्वी डीए 28 टक्के केला होता

 

यापूर्वी महागाई भत्ता 1 जुलै 2021 पासून सरकारने 28 टक्क्यांनी वाढवला होता. तत्पूर्वी तो 17 टक्क्यांपेक्षा 11 टक्क्यांनी जास्त होता.
परंतु 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीसाठी डीए फक्त 17 टक्के ठेवण्यात आला होता.
सरकारने डीए रेट्रोस्पेक्टिव्ह पद्धतीने वाढवला. यामध्ये मागील हप्ते वगळता, पुढील हप्त्यांमध्ये वाढ  लागू केली.

 

असे आहे 31 टक्क्याचे कॅलक्युलेशन

 

मूळ वेतन 56900 रुपये असल्यास नवीन 31 टक्के महागाई भत्त्यानुसार भत्ता 17639 रुपये प्रति महिना असेल. महागाई भत्त्यात एकुण वाढ 1707 रुपये होईल.
ही वाढ वार्षिक मोजली असता 20484 रुपये होईल. तर आधीच्या 28 टक्के महागाई भत्त्याच्या हिशोबाने 15932 रुपये प्रति महिना डीए मिळाला असता.

 

महागाई भत्ता म्हणजे काय?

 

महागाई भत्ता हा कर्मचार्‍याच्या मूळ पगाराचा एक निश्चित भाग असतो. महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार कर्मचार्‍यांना महागाई भत्ता देते.
याच्यात वेळोवेळी वाढ केली जाते. पेन्शनधारकांना हा लाभ महागाई सवलत (DR) म्हणून दिला जातो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title : 7th Pay Commission | modi government approves 3 percent da hike for central govt employees check details here

 

 

हे देखील वाचा :

Indrani Balan Foundation | पहिल्या ‘इंद्राणी बालन विंटर टी-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे 23 ऑक्टोबर पासून आयोजन

Nagpur Crime | नागपुरमध्ये 4 मित्रांनी फिल्मी स्टाईलने केला जिवलग मित्राचा ‘गेम’

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 89 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts