IMPIMP

Aadhaar Card ची फिजिकल कॉपी सोबत ठेवणे अडचणीचे वाटत असेल तर ‘या’ पद्धतीने मिळवू शकता पेपरलेस सुविधा

by nagesh
aadhaar-card-uidai-if-you-feel-hassle-or-difficulty-in-keeping-the-physical-copy-of-aadhaar-card-then-you-can-go-paperless-by-these-ways

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आधार कार्ड (Aadhaar Card) देशात प्रत्येक नागरिकासाठी महत्वाचे कागदपत्र आहे. रेशन आणि सिम कार्ड घेण्यापासून रेल्वे प्रवासापर्यंत ते उपयोगी पडते. परंतु अनेक लोकांना हे सोबत घेऊन फिरणे अडचणीचे वाटते. काहींना ते हरवण्याची भीती वाटते. तुम्हाला सुद्धा असे वाटत असेल तर काही सोप्या पद्धतीने पेपरलेस होऊन आधार सुविधा मिळवू शकता. (Aadhaar Card)

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

– एम आधार अ‍ॅपचे विविध फायदे

– mAadhaar : एम आधार अ‍ॅप भारतात कधीही कुठेही वापरता येऊ शकते.

– हार्ड कॉपी इतकेच एम आधार वैध आहे.

– एमआधार प्रोफाईल एयरपोर्ट आणि रेल्वेद्वारे वैध आयडी प्रूफ म्हणून स्वीकारण्यात आले आहे. एम आधार अ‍ॅपचे विविध फायदे आहेत.

– तुम्ही हरवलेल्या आधार कार्डचा नंबर मिळवू शकता.

– ऑफलाईन मोडमध्ये ते दाखवू शकता.

– इतकेच नव्हे, एम आधारद्वारे कागदपत्रांसोबत किंवा त्यांच्या शिवाय सुद्धा आधारमध्ये अ‍ॅड्रेस अपडेट करू शकता.

– एम आधारच्या मदतीने तुम्ही आपले आधार किंवा बायोमेट्रिक्स लॉक करून ते सुरक्षित ठेवू शकता. (Aadhaar Card)

– पेपरलेस केवायसी शेयर करू शकता.

– ऑफलाईन मोडमध्ये आधार एसएमएस सेवेचा वापर इत्यादी करू शकता.

 

फिजिकल कॉपी इतकेच मान्य

eAadhaar : आधार कार्डची पासवर्ड प्रोटेक्टेड (सुरक्षित) इलेक्ट्रॉनिक कॉपी असते, ज्यावर यूआयडीएआयची डिजिटल स्वाक्षरी असते. आधार कायद्यानुसार (Aadhaar Act), ई-आधार हे आधार कार्डच्या फिजिकल कॉपीच्या समान सर्व महत्वाच्या कामांसाठी मान्य आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

असे ठेवू शकता सुरक्षित

ई-आधार UIDAI च्या वेबसाईटवरून डाऊनलोड करता येऊ शकते. तुम्ही ते पीडीएफ, स्कॅन इमेज किंवा फोटोच्या प्रकारात आपला फोन, पेन ड्राईव्ह, पीसी, लॅपटॉप, टॅब, मेल किंवा क्लाऊड स्पेसवर सुरक्षित ठेवू शकता.

 

उघडण्यासाठी पासवर्डची आहे आवश्यकता

– युआयडीएआयच्या वेबसाइटवरून डाऊनलोड करण्यात आलेले ई-आधार उघडण्यासाठी ‘अडोब रिडर’ नावाचे सॉफ्टवेयर आवश्यक आहे.

– हे अ‍ॅक्सेस करण्यासाठी पासवर्ड म्हणून तुमच्या नावाच्या सुरूवातीची चार अक्षरे आणि जन्मतारखेचे वर्ष असे कॉम्बिनेशन असते.

– समजा तुमचे नाव सुरेश कुमार (SURESH KUMAR) आहे आणि तुमचा जन्म (Year of Birth) 1990 मधील असेल तर ई-आधारचा पासवर्ड SURE1990 असेल.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

हे देखील वाचा :

Sonakshi Sinha | सोनाक्षी सिन्हानं जगजाहीर केलं आपलं प्रेम; जाणून घ्या कोण आहे शत्रुघ्न सिन्हाचा जावई?

MLA Rohit Pawar | रोहित पवारांनी उपस्थित केली शंका; म्हणाले – ‘आरक्षणाचा अडथळा फक्त महाराष्ट्रातच का?’

Disadvantages of Drinking Hot Water in Winter | हिवाळ्यात वारंवार गरम पाणी पिण्याची सवय तुम्हाला सुद्धा आहे का? होऊ शकते गंभीर नुकसान

 

Related Posts