IMPIMP

Sonakshi Sinha | सोनाक्षी सिन्हानं जगजाहीर केलं आपलं प्रेम; जाणून घ्या कोण आहे शत्रुघ्न सिन्हाचा जावई?

by nagesh
Sonakshi Sinha | shatrughan sinhas son in law sonakshi expressed her love know who is close to salman khan

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Sonakshi Sinha | सुपरस्टार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughna Sinha) यांची मुलगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेटकऱ्यांच्या चर्चेत आहे. सोनाक्षीनं आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु आता सोनाक्षी प्रेमात पडली असल्याचं म्हटलं जातंय. तर सोनाक्षीचा बॉयफ्रेंड सलमान खानचा नातेवाईक असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर जोरात रंगताना दिसत आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

सोशल मीडियावर सोनाक्षीनं एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या पोस्टनं सर्व नेटकऱ्यांचे लक्ष चांगलेच वेधून घेतले आहे. ‘नोटबुक’ (Notebook) या चित्रपटातील अभिनेता जहीर इकबाल (Jahir Ikbaal) सोबत ती डेट करत असल्याचं म्हटलं जातंय. नुकतंच तिनं जहीर सोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 10 डिसेंबरला जहीरचा वाढदिवस झाला. तिनं फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कॅप्शनमध्ये तिनं, “जगातील सर्वात जास्त त्रास देणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. जगातील सगळ्यात जास्त चांगला व्यक्ती आहे. तू असं का आहेस? वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा….” असं लिहिलं आहे.
तसेच हॅशटॅग बेस्टबेस्टफ्रेंड आणि व्हाटअगाय असं वापरले आहेत. शेअर केलेला फोटोमध्ये सुनाक्षी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
तर त्यानं चेक्सचा शर्ट घातला आहे.

 

 

दरम्यान, सोनाक्षीच्या (Sonakshi Sinha) या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी तसेच तिच्या मित्रमैत्रिणींनी कमेंट्स पाऊस पडला आहे.
जहीरनं सुद्धा या पोस्टवर कमेंट केली आहे. जहीर म्हणाला, “पण ती माझी खास मैत्रीण आहे…. बरोबर.”
तर पुढे त्यान आणखी एक खास कमेंट करत, “आता मी अधिकृतरित्या तुला माझी हीरोइन म्हणू शकतो.”
असं म्हटलं आहे. त्यामुळे सोनाक्षी जहीरला डेट करत असल्याच्या तीव्र प्रमाणात चर्चा रंगल्या आहेत.

 

 

 

Web Title :- Sonakshi Sinha | shatrughan sinhas son in law sonakshi expressed her love know who is close to salman khan

 

हे देखील वाचा :

MLA Rohit Pawar | रोहित पवारांनी उपस्थित केली शंका; म्हणाले – ‘आरक्षणाचा अडथळा फक्त महाराष्ट्रातच का?’

Disadvantages of Drinking Hot Water in Winter | हिवाळ्यात वारंवार गरम पाणी पिण्याची सवय तुम्हाला सुद्धा आहे का? होऊ शकते गंभीर नुकसान

Maharashtra Temperature | महाराष्ट्रात आणखी काही दिवसांनंतर थंडीची लाट; पुण्यात तापमानाचा पारा 12 अंशावर

 

Related Posts