IMPIMP

Aaditya Thackeray | केदार दिघेंच्या उपस्थिती आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरासमोर शिवसैनिकांशी साधला संवाद

by nagesh
Aditya Thackeray | shivsena leader aditya thackeray attacks rebel mlas and cm eknath shinde in bhiwandi thane

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंडखोरी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी आणि शिवसैनिकांसोबत संवाद साधण्यासाठी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिवसंवाद यात्रा (Shiv Samvad Yatra) सुरु केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांच्या (Rebel MLA) मतदार संघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधला जात आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जाहीर सभा घेत शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे ठाण्यात विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. आनंद दिघे (Anand Dighe) यांचे पुतणे केदार दिघे (Nephew Kedar Dighe) यांच्याकडूनही आदित्य ठाकरे यांचे स्वागत करण्यात आलं. महत्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरासमोर गाडी थांबवून गर्दी करुन उभे असलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधला. या संवादानंतर आदित्य ठाकरे पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

 

 

खाऊन अपचन झालेले लोक सोडून गेले
शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता खाऊन खाऊन अपचन झालेले लोक सोडून गेलेत, अशी घणाघाती टीका केली. जे आज बंड आणि उठाव केल्याचं बोलत आहेत त्यांनी उठाव नाही तर गद्दारी केली असल्याचे ठाकरे म्हणाले. मी लहानपणापासून बघत आलो आहे. जे लोक हक्कानं घरी यायचे. काम घेऊन यायचे आणि नवी जबाबदारी मागायचे. कुटुंबातील माणसासारखं यांना आजवर शिवसेनेने सांभाळलं. त्यांनीच आज पाठीत खंजीर खुपसला. ज्या शिवसेनेने दिले त्याच पक्षासोबत गद्दारी केल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली.

 

म्हणून ही वेळ आली
अडीच वर्षाच्या काळात आम्ही कोणताही भेदभाव न करता विकासाची काम करत आलो.
24 तास सेवा करत आलो. या काळात आमचं चुकलं ते म्हणजे आम्ही राजकारण केलं नाही.
आपल्याला राजकारण जमलं नाही म्हणून ही वेळ आल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले.
आम्ही 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण केले. त्यांच्यावर अंध विश्वास ठेवला म्हणून ते गेले.
परंतु शिवसैनिकांवरचा विश्वास कायम राहणार असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Aaditya Thackeray | shiv sena leader aditya thackeray went to thane today and interacted with shiv sainiks

 

हे देखील वाचा :

Reservation | ‘ओबीसींचं आरक्षण 17 % करुन उर्वरीत 10 % आरक्षण मराठा समाजाला द्या’, मराठा क्रांती मोर्चाची मागणी

LIC Jeevan Labh Scheme | एलआयसीची ‘ही’ स्कीम 25 वर्षात तुम्हाला देऊ शकते 54 लाख रुपये, येथे जाणून घ्या सविस्तर

ITR Filing Verification | ITR व्हेरिफाय कसे करावे? या 6 पद्धतीने करू शकता आपला इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरिफाय, जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts