IMPIMP

Ahmednagar ACB Trap | शिक्षकाकडून लाच मागणाऱ्या महिला अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बेड्या

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाईन   कोरोनाने पत्नीचे निधन झाल्याने तिच्या रुग्णालय खर्चाची रक्कम मिळावी, यासाठी शिक्षकाने जिल्हा परिषदेत सर्व कागदपत्रांची पूर्तता करत अर्ज केला. पण या कामासाठी त्यांच्याकडे वरिष्ठ सहाय्यक अधिकाऱ्याने 5000 रुपयांची लाच (Ahmednagar ACB Trap) मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्याच्या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत लाचखोर महिला अधिकाऱ्यास (Ahmednagar ACB Trap) ताब्यात घेतले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तक्रारदार जिल्हा परिषद शिक्षक यांच्या पत्नी जून २०२१ मध्ये कोरोनाने आजारी होत्या. त्यांनी त्यांना उपचारासाठी अहमदनगरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तक्रारदार यांनी पत्नीचे उपचाराचे बील स्वतः भरले. त्यानंतर हे बील जिल्हा परिषदेतून मंजूर होऊन मिळण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांसह पंचायत समिती श्रीरामपूरमार्फत जुलै 2021 मध्ये दाखल केले. (Ahmednagar ACB Trap) त्यानंतर हे बील मंजूर करण्यासाठी वरिष्ठ सहाय्यक चंदा चंद्रकांत ढवळे Chanda Chandrakant Dhavale (प्राथमिक शिक्षण विभाग, वर्ग – 3 जि.प. अहमदनगर) यांनी 5000 रुपयांची लाच मागितली. या प्रकाराची तक्रार लाचलुचपत विभाग अहमदनगर यांच्याकडे करण्यात आली होती.

 

त्यानुसार दि. 07 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद शिक्षण विभाग येथे सापळा रचत लाचलुतपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी साक्षीदार यांच्यासमोर लाच मागणी पडताळणी केली. त्यात चंदा चंद्रकांत ढवळे यांनी 5000 रुपयांची मागणी करुन ही रक्कम स्वाकारण्याची तयारी दर्शविली. त्यावेळी सापळा पथकाने त्यांना अटक केली.

 

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने (ACB SP Sunil Kadasane),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde) पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
तसेच सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर (DySP Harish Khedkar),
सहायक सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे (PI Gahininath Game), आणि शरद गोरडे (PI Sharad Gorade)
यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक पोलीस हवालदार संतोष शिंदे, विजय गंगूल, पोना रमेश चौधरी,
पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के,
राधा खेमनर चालक हारून शेख यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ahmednagar ACB Trap | Ahmednagar ACB Trap Chanda Chandrakant Dhavale Arrested While Taking Bribe

 

हे देखील वाचा :

Pune PMC – PM Awas Yojana | पंतप्रधान आवास योजना बंद झाल्याने यापुढील काळात या योजनेअंतर्गत नवीन प्रकल्प नाही

BMC Elections | BMC च्या प्रभागाच्या संख्येवरून आता पालिका आणि राज्य निवडणूक आयोग नोंदवणार जबाब; उच्च न्यायालयाचे याचिका सुनावणीवेळी आदेश

Shraddha Walkar Murder | श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी न्यायालयात हजर; फाशीसाठी आवारात वकिलांचा राडा

 

Related Posts