IMPIMP

Air Marshal V R Chaudhari | गौरवास्पद ! महाराष्ट्रातील नांदेडचे सुपुत्र व्ही. आर. चौधरी हवाई दलाच्या प्रमुखपदी

by nagesh
Air Marshal V R Chaudhari | Air Chief Marshal VR Chaudhari takes over as new IAF chief from RKS Bhadauria

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया (RKS Bhadauria) हे आज सेवानिवृत्त (Retired) झाले आहेत. त्यांच्या जागी महाराष्ट्राचे सुपूत्र व्ही. आर. चौधरी ( Air Marshal V R Chaudhari) यांनी हवाई दल प्रमुख पदाचा पदभार स्विकारला आहे. यापुर्वी एअर मार्शल असलेल्या व्ही. आर चौधरी ( Air Marshal V R Chaudhari) यांना देशाचे हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने (Central Government) काही दिवसांपूर्वी घेतला होता. चौधरी यांनी जुलै महिन्यात हवाई दलाच्या उपप्रमुख पदाचा कार्यभार स्विकारला होता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

विवेक राम चौधरी  हे यापुर्वी भारतीय दलाच्या वेस्टर्न कमांडरचे (Western Command) कमांडर इन चिफ (Commander-in-Chief) होते.
या पदावर असताना त्यांनी कठीण समजल्या जाणाऱ्या उत्तर भारतातील लडाख आणि इतर भागांमध्ये देशाचे संरक्षण करण्याचे काम केले आहे.
हवाई दलाच्या लढाऊ विभागामध्ये 29 डिसेंबर 1982 रोजी एअर मार्शल चौधरी यांचा समावेश करण्यात आला होता.

 

 

व्ही. आर. चौधरी हे महाराष्ट्राचे सुपुत्र असून ते नांदेडचे (Nanded) रहिवासी आहेत. सुमारे तीन वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी हवाई दलाच्या विविध विभागांत काम केले.
तसेच आपल्या कार्यकाळात त्यांनी मिग-21 (MiG-21), मिग एमएफ (MiG MF) आणि सुखोई एमकेआय (Sukhoi MKI) या ही लढाऊ विमानं उडवत 3800
पेक्षा जास्त तासांचा विमान चालवण्याचा अनुभव घेतला आहे.

 

Web Title : Air Marshal V R Chaudhari | Air Chief Marshal VR Chaudhari takes over as new IAF chief from RKS Bhadauria

 

हे देखील वाचा :

Yoga Guru Sadashiv Nimbalkar | योगगुरु पद्मश्री सदाशिव निंबाळकर यांचे निधन

Pune Corporation | वृक्ष छाटणीसाठी पालिका क्षेत्रीय अधिकाऱ्यांचं 5 ते 50 हजाराचं ‘रेटकार्ड’ ! नगरसेवक बाळासाहेब ओसवाल यांच्याकडून ‘स्थायी समितीच्या’ बैठकीत ‘भांडाफोड’

‘या’ पाच Mutual Funds ने 20 वर्षात गुंतवणुकदारांना बनवले करोडपती; जाणून घ्या किती टक्के दिला रिटर्न

 

Related Posts