IMPIMP

Airtel Prepaid Tariff Rates | भारती एयरटेलने प्रीपेड टॅरिफमध्ये केली 25% पर्यंत वाढ, जाणून घ्या कधीपासून होणार लागू

by nagesh
airtel smart recharge plan data call sms all that it offers

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Airtel Prepaid Tariff Rates | टेलीकॉम फर्म भारती एयरटेल (Bharti Airtel) ने आपल्या प्रीपेड योजनांबाबत (airtel prepaid plans) एक मोठी घोषणा केली आहे. एयरटेलने आपल्या प्रीपेड प्लान्समध्ये जवळपास 25 टक्केपर्यंत टॅरिफ दर (Airtel Prepaid Tariff Rates) वाढवले आहेत. भारती एयरटेलने आपले प्रीपेड टॅरिफ 20 टक्केवरून 25 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन टॅरिफ 26 नोव्हेंबरपासून प्रभावी होतील. आपल्या टॅरिफ रेटमध्ये वाढ केल्यानंतर भारती एयरटेलचे शेयर्स (bharti airtel share) सोमवारी (22 नोव्हेंबर) इंट्रा-डे ट्रेडमध्ये बीएसईवर 6 टक्केच्या नवीन उंचीवर पोहचले.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

या निर्णयानंतर कंपनीने म्हटले की, हा निर्णय आर्थिकदृष्ट्या निरोगी व्यवसाय मॉडल साठी होता. याच वर्षी जुलैमध्ये एयरटेलने पोस्टपेड प्लानच्या किमतीत वाढ (airtel postpaid plans price increase) केली होती.

 

एयरटेलचे नवीन प्रीपेड प्लान (Airtel new prepaid plans)

26 नोव्हेंबरपासून एयरटेल नवीन प्रीपेड टॅरिफ (airtel new prepaid tariff) सह मार्केटमध्ये उतरले. माहितीनुसार, सध्या 79 रुपयांच्या प्लानची किंमत 99 रुपये होईल. अशाच प्रकारे, 149 रुपयांच्या प्लानची किंमत 179 रुपये, 1,498 च्या प्लानची किंमत 1,799 रुपये होईल.

 

याशिवाय ज्या इतर प्लानमध्ये वाढ करण्यात आली आहे, त्यांच्यात 28 दिवसांच्या वैधतेसह 219 रुपयांच्या प्रीपेड प्लानचा सुद्धा समावेश आहे,
जो 265 रुपयांपर्यंत वाढवला आहे. तर 249 रुपयांच्या प्लानची किंमत 299 रुपयांपर्यंत वाढवली आहे.
तर 2,498 रुपयांच्या प्लानची किंमत 2,999 रुपये होईल.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

एयरटेल न्यू डेटा प्लान 2021 (Airtel new data plan 2021)

जर डेटा टॉपअप बाबत बोलायचे तर डेटा टॉप अपची किंमत आता अनुक्रमे 48 रुपयांचा टॉपअप प्लान 58 रुपये,
98 रुपयांचा टॉपअप प्लान 118 आणि 251 रुपयांचा टॉपअप प्लान 301 रुपये होईल.

 

Web Title :- airtel prepaid tariff rates price increase 25 percent new prepaid plans data plan 2021 bharti airtel share 26 november 2021 Airtel Prepaid Tariff Rates marathi news policenama

 

हे देखील वाचा :

Pune Crime | Tata, LG कंपनीत नोकरी देण्याच्या आमिषाने तरुणांची फसवणूक, 5 जणांवर FIR

Nashik Crime | पोलीस भरती परीक्षेत अपयश आल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; परिसरात खळबळ

Ashish Shelar | भाजपामध्ये देखील अंतर्गत वाद? आशिष शेलार अवघ्या 5 मिनिटांमध्ये स्टेजवरून निघाले

 

Related Posts