IMPIMP

Arvind Sawant On Rahul Narwekar |”राहुल नार्वेकर रंग बदलणारा सरडा”, अरविंद सावंत यांचा भाजपावर हल्लाबोल, म्हणाले…

by sachinsitapure

मुंबई : Arvind Sawant On Rahul Narwekar | ही अशी माणसं आहेत. ते आधी आमच्या शिवसेनेत होते (Shivsena). मी त्यांना रंग बदलणारा सरडा म्हणतो. येथे होते तेव्हा भगवा, नंतर राष्ट्रवादीकडे गेले. त्यानंतर तोही पक्ष सोडला आणि भाजपात गेले (BJP). या माणसाने कुलाब्यात (Colaba Assembly Constituency) काय काम केले? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते (Shivsena UBT) आणि मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील (Mumbai South Lok Sabha Constituency) उमेदवार अरविंद सावंत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. ते कुलाबा येथील मविआच्या (Mahavikas Aghadi) प्रचारसभेत बोलत होते.

अरविंद सावंत म्हणाले, हे सरकार संवेदनाहीन आहे, त्यांना कोणाचीही काळजी नाही. निवडणूक आयोगापासून काही स्वायत्त यंत्रणा सत्ताधार्‍यांच्या गुलाम झाल्या आहेत. आदर्श घोटाळ्यावर व्हाईट पेपर जाहीर केल्याच्या दुसर्‍याच दिवशी अशोक चव्हाण भाजपाच्या वॉशिंग मशीनचे लाभार्थी झाले.

राहुल नार्वेकर यांच्यावर टीकास्त्र डागताना अरविंद सावंत पुढे म्हणाले, एक भोंगा सारखा उमेदवारी मिळणार म्हणत होता. मग काय या गल्लीत दादागिरी, त्या गल्लीत दादागिरी करत होते. मात्र, ज्या दिवशी त्यांचे नाव लोकसभेच्या उमेदवारीमधून कट झाले त्या दिवशी संपूर्ण कुलाब्याने आनंद व्यक्त केला. काल परवा त्यांनी या ठिकाणी सभा घेतली. त्यांनी घेतलेल्या सभेमध्ये खुर्च्या रिकाम्या होत्या. रिकाम्या खुर्च्या समोर त्यांनी भाषण केले. आता मी त्यांना सांगतो की, येथे पाहायाला या, तुमच्या हातातून कुलाबा निसटला आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. आता प्रचारासाठी फक्त काही दिवस उरल्याने उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत आक्रमकरित्या प्रचार करत आहेत.

Punit Balan | युवा उद्योजक पुनीत बालन, जान्हवी धारीवाल बालन यांनी बजावला मतदानाचा हक्क, पुणेकरांना मतदान करण्याचे केले आवाहन (Video)

Related Posts