IMPIMP

Ajit Doval-National Security Advisor (NSA) | अजित डोवाल यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती

by sachinsitapure

दिल्ली: Ajit Doval-National Security Advisor (NSA) | नव्या सरकारला मतदारांनी कौल दिल्यानंतर आणि मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर प्रमुख पदांवरील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पुन्हा एकदा अजित डोवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत.

डोवाल यांच्याशिवाय पंतप्रधानांच्या मुख्य सचिवांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरही पुन्हा एकदा पी.के.मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या सूचनेनुसार अजित डोवाल आणि पी.के.मिश्रा यांचा कार्यकाळ सध्याचे पंतप्रधान हे पदावर असेपर्यंत कार्यरत असणार आहेत.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे (NSC) वरिष्ठ अधिकारी असतात. NSA म्हणून त्यांची नियुक्ती केली जाते. त्यांचं काम राष्ट्रीय सुरक्षा धोरण तयार करणे आणि धोरणात्मक बाबींवर सल्लागार म्हणून काम करणे असते.

ते भारताच्या पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार म्हणून देखील काम करतात. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे सर्व गुप्तचर अहवाल पंतप्रधानांना सादर करत असतात. भारताच्या अंतर्गत आणि बाह्य धोके लक्षात घेऊन ते निर्णय घेत असतात. अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

Related Posts