IMPIMP

Ajit Pawar | पुण्यात अजित पवार यांचे झळकले बॅनर; जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू (Video)

by nagesh
Ajit Pawar | Ajit Pawar’s banner flashed in Pune; Chief Minister in the minds of the people, the center of state politics (Video)

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – विधानसभेच्या २०२३ च्या निवडणुकीत कशाला? आताही मुख्यमंत्रीपद आमच्याकडे ठेवायची आमची तयारी, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका वृत्तसमुहाच्या मुलाखतीत सांगून आपल्या मुख्यमंत्री व्हायचंय असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर रात्रोरात्र राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाचे बॅनर झळकावले. कोथरुड येथील जयभवानी नगर, शिवतीर्थनगर, पौड रोड येथे हे बॅनर लावले गेले आहेत. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असे त्यावर म्हटले आहे.’

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मागील काही दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) या भावी मुख्यमंत्री अशी चर्चा रंगली होती. तशा आशयाचे फ्लेक्सही झळकले होते. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडे जाणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बँडाची चर्चा दोन तीन दिवस राज्याच्या राजकारणात रंगली होती. आपणच राष्ट्रवादीतील २ नंबरचे नेते आहोत, हे दाखविण्यासाठी हे सर्व प्रकरण रंगविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Policenama (@policenamaa)

 

दरम्यान, अजित पवार यांनी पिंपरीत एका मुलाखतीत आपल्या आताही मुख्यमंत्री होण्यास आवडेल, असे सांगितले. त्यानंतर कोथरुड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतोष डोख (Santosh Dokh) यांनी रात्रीत कोथरुडमध्ये बॅनर झळकाविले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेली १८ वर्षे काम करीत असून अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत. त्यांच्या अंगी ती क्षमता आहे. त्यांचा अनुभव सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी इच्छा व्यक्त केल्याने बॅनरद्वारे त्यांनी शुभेच्छा दिल्याचे संतोष डोख यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :  Ajit Pawar | Ajit Pawar’s banner flashed in Pune; Chief Minister in the minds of the people,
the center of state politics (Video)

 

हे देखील वाचा :

Basweshwar Jayanti 2023 | समतेची शरण चळवळ आणि महात्मा बसवण्णा

Indian Pest Control Association – IPCA | इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशन : आरोग्यदायी घरासाठी ‘पेस्ट कंट्रोल’ गरजेचे; जनजागृती व्हावी

Maharashtra Govt News | डॉ.विजयकुमार गावित – सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी निधी उपलब्ध करुन देणार

Maharashtra Govt Job | माहिती विभागाच्या पदभरतीत पदव्युत्तर पदवी, पदविकाधारकांना संधी मिळणार

 

Related Posts