IMPIMP

Ajit Pawar On BJP | ‘झुंडशाहीच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थाच मोडून काढण्याचा डाव काहीजण करताहेत’; अजित पवारांचा भाजपवर निशाणा

by nagesh
Ajit Pawar On BJP | ajit pawar slams bjp in Talegaon of pune on inflation hanuman chalisa loudspeaker row

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar On BJP | तळेगाव नगरपरिषद (Talegaon Municipal Council) इमारतीचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री
आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित सभेत बोलताना अजित पवार यांनी भाजपवर
(BJP) अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ‘झुंडशाहीच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थाच मोडून काढण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत,’ अशी टीका
त्यांनी केली. तसेच, ‘विकासाचे दावे फोल ठरल्याने भावनेला हात घालून, जातीय तेढ निर्माण करून लोकांच्या मनात विष कालवण्याचे काम केले जात
असल्याचंही,’ ते म्हणाले. (Ajit Pawar On BJP)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, “देशाच्या एकतेला, अखंडतेला धोका निर्माण होण्यासारखी परिस्थिती सध्या निर्माण झालीय.
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दर आकाशाला भिडले आहेत.
जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. श्रीलंकेत लोकप्रतिनिधींची घरे, मोटारी जाळण्यात आल्या. पाकिस्तानात बॉम्बस्फोट, जातीय दंगे घडत आहेत.
आपल्या शेजारी राष्ट्रातील हे वातावरण भारताला परवडणारे नाही.
आपल्याकडेही भोंगे, हनुमान चालीसा, मारुतीरायाचे जन्मस्थान असे प्रश्न उपस्थित करून वातावरण पेटवण्याचे काम सुरू असल्याचं,” ते म्हणाले. (Ajit Pawar On BJP)

 

 

पुढे अजित पवार म्हणाले, “अशा प्रकारच्या मुद्यांमुळे बेकारी, महागाईचे प्रश्न सुटणार आहेत की जातीय दंगे थांबणार आहेत, याचा विचार झाला पाहिजे.
प्रत्येकाने आपल्या जाती, धर्माचा अभिमान जरूर बाळगावा.
मात्र, दुसऱ्याला त्रास होईल, असे काही करू नये. कोणताही धर्म चुकीचे वागा, असे सांगत नाही.
सर्व जाती, धर्मातील मावळे एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) स्वराज्य स्थापन करून कल्याणकारी राज्य केले, हा इतिहास आहे. नेमका तोच विसरून नको त्या गोष्टी केल्या जात आहेत.,” असं ते म्हणाले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

चंद्रकांत पाटलांना टोला –
“जगात आमचा पक्ष मोठा आहे, असे भाजपवाले एकीकडे सांगतात आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष महिलांबद्दल पुण्यात अपशब्द वापरतात.
आम्ही ग्रामीण भागातून आलो आहेत. आम्हालाही बरेच काही बोलता येते.
‘भ’ ची भाषा आम्ही सुरू केली तर पळून जाण्याची वेळ येईल. पण आम्ही त्या स्तरावर जाणार नसल्याचं,” पवार यांनी म्हटलं आहे.

 

 

Web Title :- Ajit Pawar On BJP | ajit pawar slams bjp in Talegaon of pune on inflation hanuman chalisa loudspeaker row

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर, 1 जुलैपासून वाढू शकतो 5% DA

Pravin Darekar In Pune | ‘महागाई, बेरोजगारी वाढली ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही, परंतू भारतीय जनता PM नरेंद्र मोदी यांच्यावर खूश’ – प्रविण दरेकर

Sanjay Raut On BJP | ‘भाजपने पैसे वाया घालवू नयेत, राज्यसभेची 6 वी जागा महाविकास आघाडीच जिंकणार’ – संजय राऊत

 

Related Posts