IMPIMP

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर, 1 जुलैपासून वाढू शकतो 5% DA

by nagesh
8th Pay Commission | no proposal for setting up 8th pay commission big update on da hike

नवी दिल्ली : वृत्तसंस्था7th Pay Commission | केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी (Central Government Employees) आणि पेन्शनधारकांसाठी (Pensioners) एक आनंदाची बातमी आहे. त्यांना देशातील वाढत्या महागाईपासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सरकार 1 जुलैपासून महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ (DA Hike) करू शकते. (7th Pay Commission)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

डीए 34 टक्क्यांवरून वाढू शकतो 39 टक्क्यांपर्यंत
वास्तविक, मार्च 2022 मध्ये AICPI निर्देशांकात वाढ झाली होती, त्यानंतर सरकार महागाई भत्त्यात (DA) 3 नव्हे तर 5 टक्क्यांनी वाढ करेल अशी अपेक्षा आहे.

असे झाल्यास कर्मचार्‍यांचा डीए 34 टक्क्यांवरून 39 टक्के होईल. असे झाल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात 27 हजारांहून जास्त वाढ होऊ शकते. (7th Pay Commission)

 

AICPI निर्देशांक आला
या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात एआयसीपीआय निर्देशांकात घसरण झाली. जानेवारीमध्ये 125.1, फेब्रुवारीमध्ये 125 आणि मार्चमध्ये एक पॉइंट वाढून 126 झाला.

एप्रिलच्या आकडेवारीनुसार, एआयसीपीआय निर्देशांक 127.7 वर आला आहे. यामध्ये 1.35 टक्क्यांनी वाढ झाली आहे, म्हणजेच आता मे आणि जूनची आकडेवारी 127 च्या पुढे गेल्यास 5 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

39% डीए झाल्यास इतका वाढेल पगार
कर्मचार्‍याचे मूळ वेतन 56,900 रुपये असल्यास त्याला 39% डीए मिळाल्यावर 22191 रुपये डीए मिळेल.
सध्या 34 टक्के दराने 19,346 रुपये मिळत आहेत. 5% डीए वाढल्याने पगारात 2,845 रुपयांनी वाढ होणार आहे.
अशा प्रकारे, सुमारे 34,140 रुपयांची वार्षिक वाढ होईल.

 

50 लाख कर्मचार्‍यांना फायदा
सरकार वर्षातून दोनदा डीए वाढवते. या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने डीएमध्ये वाढ केली आहे.
आता डीए 5 टक्क्यांनी वाढवण्याच्या निर्णयाचा फायदा 50 लाखांहून अधिक कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission update central government employees da likely be 39 percent from 1 july 2022

 

हे देखील वाचा :

Pravin Darekar In Pune | ‘महागाई, बेरोजगारी वाढली ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही, परंतू भारतीय जनता PM नरेंद्र मोदी यांच्यावर खूश’ – प्रविण दरेकर

Sanjay Raut On BJP | ‘भाजपने पैसे वाया घालवू नयेत, राज्यसभेची 6 वी जागा महाविकास आघाडीच जिंकणार’ – संजय राऊत

Maharashtra Crime News | सेक्सटॉर्शन ! अश्लिल व्हिडिओ कॉल करुन खंडणी मागणार्‍या टोळीचा पर्दाफाश; पत्रकार, पोलिसाच्या ‘साथी’ने महिला करीत होती लोकांना ‘ब्लॅकमेल’

 

Related Posts