IMPIMP

Ajit Pawar | पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप केल्याचा रोहित पवारांचा आरोप, अजित पवार म्हणाले, मी..

by sachinsitapure

बारामती : Ajit Pawar | बारामती मतदार संघात (Baramati Lok Sabha) काल मतदानाच्या पूर्वसंध्येला अजित पवार गटाकडून (Ajit Pawar NCP) भोरमध्ये मतदारांना (Bhor Vidhan Sabha) पोलिसांच्या उपस्थितीत पैसे वाटप करण्यात आला आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. या संदर्भातील व्हिडिओसुद्धा रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याबाबत आता स्वता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले की, अशा प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोग सक्षम आहे. मी आतापर्यंत सात विधानसभेच्या आणि एक लोकसभेची निवडणूक लढली आहे. आतापर्यंत असे प्रकार कधी केले नाहीत. कारण नसताना विरोधकांचे बगलबच्चे असे आरोप माझ्यावर करत आलेले आहेत.

अजित पवार म्हणाले, मी त्याला फार महत्व देत नाही. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाचे स्कॉड असतात. पोलीस असतात. निरीक्षक असतात. तरीदेखील ते आमच्यावर आरोप करत आहेत. तसेच आरोप मी देखील त्यांच्यावर करु शकतो. त्यांनी ही निवडणूक योग्य प्रकारे हाताळली नाही.

दरम्यान, पैसे वाटप करतानाचे व्हिडिओ रोहित पवार यांनी साशेल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबत लिहिले आहे की, बारामती मतदारसंघात चक्क पोलिस बंदोबस्तात पडतोय पैशांचा पाऊस… यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडीओ शेअर करतोय… यामध्ये भोर तालुक्यातील अजितदादा मित्रमंडळाचा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसत आहेत. यासाठीच पाहीजे होती का वाय दर्जाची सुरक्षा? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

Related Posts