IMPIMP

Ambadas Danve | मेंढपाळांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई करावी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली मागणी

by nagesh
Maharashtra Politics Issue | | ambadas danve comment on maharashtra political crisis next hearing on 14th feb

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन   Ambadas Danve | राज्यात ठिकठिकाणी मेंढपाळांना मारहाण करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार समोर येत आहेत. खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली . या विषयावर त्यांनी लक्षवेधी सूचनेद्वारा चर्चा उपस्थित केली. (Ambadas Danve)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मेंढपाळांना उदरनिर्वाहासाठी गावात काही जमीन क्षेत्र राखीव ठेवावे आणि प्रायोगिक तत्त्वावर चराई वनजमीन मेंढपाळांना उपलब्ध करून द्यावी. तसेच पशुविमा संरक्षण देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी सूचना दानवे यांनी केली. (Ambadas Danve)

 

कोणताही गुन्हा दाखल करताना सखोल चौकशी करावी अशा सूचना नऊ वेळा गृहविभागाने दिल्या आहेत.
असे असतानाही काही पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी चुकीच्या पद्धतीने अन्याय,
अत्याचार करून खोटे गुन्हे दाखल करत असतील तर त्याची माहिती दिल्यास व्यक्तीगत चौकशी केली जाईल,
अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दानवे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना दिली.

 

मेंढपाळांना उदरनिर्वाहासाठी ९०० हेक्टर जमीन निश्चित केली असून ती अर्धबंदीस्त स्वरूपात असणार आहे.
तसेच या संदर्भात उपमुख्यमंत्री यांना विनंती करुन सर्व सचिव संबंधित मंत्री व चर्चेत विविध मुद्दे उपस्थित
केलेले सदस्य यांची एकत्रित बैठक लावण्यात येईल अशी ग्वाही वनमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ambadas Danve | Action should be taken against those who file false cases against herdsmen; Opposition leader Ambadas Danve demanded

 

हे देखील वाचा :

Crime News | हॉस्टेलमध्ये विद्यार्थीनीने दिला मुलीला जन्म, बदनामीच्या भीतीने केली हत्या, बॉयफ्रेंडवर सुद्धा गुन्हा दाखल

Gauahar Khan | अभिनेत्री गौहर खानची चाहत्यांना गुडन्यूज; लवकरच होणार….

Pune Crime | माणिकबागेतील व्यापार्‍यावर फायरिंग करून जीवे मारण्याचा प्रयत्न; सिंहगड रोड पोलिसांकडून आरोपीला 8 तासात अटक

 

Related Posts