IMPIMP

Amol Mitkari On Raj Thackeray | अमोल मिटकरींनी राज ठाकरेंचा ‘खाज’ ठाकरे म्हणून उल्लेख करत केली मिमिक्री; म्हणाले…

by nagesh
Amol Mitkari | 'The rotten brain under the black hat of Bhagat Singh Koshyari' - Amol Mitkari

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन Amol Mitkari On Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे जातीयवादी असल्याची टीका केली होती. या टीकेनंतर आता राष्ट्रवादी आणि मनसेचे नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेत सांगलीमध्ये (Sangli) राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज ठाकरेंना लक्ष्य केलेलं पाहायला मिळालं. त्यावेळी राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंचा ‘खाज’ ठाकरे असा उल्लेख केला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

साहेबांवर बोलले म्हणून मी खाजसाहेब बोललो. निसर्गाने आम्हालाही दोन हात, पाय, डोकं आणि त्यात मेंदू दिला. पण मेंदू कोणाचा गुलाम ठेवावा याचं भान दिलं, असं म्हणत मिटकरींनी टोला लगावला. त्यासोबतच मिटकरींनी स्टेजवरून हनुमान चालिसा आणि मारूती स्तोत्रही म्हणून दाखवलं.

 

 

पेट्रोल (Petrol), गॅसवर (Gas), डिझेलवर (Diesel) बोलत नाहीत, नकला करतात…चांगला टाइमपास (Timepass) आहे. मुस्लिमांनी हनुमान चालिसाला (Hanuman Chalisa) विरोध कधी केला का ?, असा सवालही अमोल मिटकरींनी केला. महाराष्ट्रात जोरजोरात बोलण्याची स्पर्धा सुरू आहे. शरद पवारांवर बोलण्यासाठी भाजपची एक टीम तयार झाली असल्याचं मिटकरी म्हणाले.

 

दरम्यान, गोवा (Goa Election 2022) जिकल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर (Nagpur) मध्ये रोड शो केला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सत्ताबदल होणार सांगितलं. पण कोल्हापूरनंतर (Kolhapur) गप्प झाल्याचं म्हणत मिटकरींनी फडणवीसांवरही निशाणा साधला. आता मनसे नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करायला सुरूवात केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Amol Mitkari On Raj Thackeray ncp amol mitkari on mns raj thackeray bjp devendra fadanvis kirit somaiya

 

हे देखील वाचा :

Pune Crime | तडीपार असताना खुनाचा प्रयत्न करुन फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

Pune Crime | कात्रज-कोंढवा रोडवर पोलिसांची कारवाई ! गुन्हे शाखेकडून 4 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Stomach Bloating Problem | जेवल्यानंतर तुमचं पोट फुगतं?; मग ‘हे’ पदार्थ खाणे टाळा; जाणून घ्या

 

Related Posts