IMPIMP

Ankylosing Spondylitis | पाठदुखीकडे दुर्लक्ष करू नका, एंजिलायझेशन स्पॉन्डिलायटीसची समस्या असू शकते

by nagesh
Ankylosing Spondylitis | ankylosing spondylitis do not ignore chronic back pain ankylosing spondylitis can be a problem

सरकारसत्ता ऑनलाइन – Ankylosing Spondylitis | जर पाठदुखीचा (Back Pain) त्रास बर्‍याच दिवसांपूसन असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण हे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटीसचे लक्षण (Ankylosing Spondylitis Symptoms) देखील असू शकते. त्यावर वेळीच उपचार होणे गरजेचे आहे, अन्यथा परिस्थितीही बिकट होऊ शकते (Ankylosing Spondylitis).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जर पाठदुखी ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ असेल तर तज्ज्ञांना भेटणे आवश्यक आहे. कारण ते अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटीस (एएस) सारख्या गंभीर समस्येचे लक्षण देखील असू शकते. वेदना हळूहळू वाढत जातात. तात्पुरता बॅक पेन आणि दाहक बॅक पेन यांच्यातील फरक लक्षात येत नाही. म्हणून त्याकडे दुर्लक्ष होते.

 

दिल्लीचे संधिवाततज्ज्ञ डॉ. वेद चतुर्वेदी (Dr. Ved Chaturvedi) म्हणतात, “अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटीस हा एक ऑटो इंफ्लेमेटरी रोग आहे. तो कशामुळे होतो हे अजून स्पष्ट झालेले नाही. जरी वैद्यकीय संशोधनाच्या आधारे असे आढळले आहे की, एचएलए बी २७ जनुक आणि आतड्यांसंबंधी जीवाणू या अवस्थेसाठी सहाय्यक घटक आहेत (Ankylosing Spondylitis).

 

या अवस्थेने ग्रस्त असलेल्या रूग्णांनी मात्र सतर्क राहिले पाहिजे. एखाद्यास पाठीच्या खालच्या भागात जळजळ आणि खालच्या अंगाच्या सांधेदुखीचे निदान झाल्यास त्यांनी त्वरित संधिवाततज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. म्हणजे त्यावर अचूक उपचार होतील.”

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नवी दिल्लीतील रिमेटोलिस्ट डॉ. पी. डी. रथ (Dr P D Rath) म्हणतात,
“एएससारख्या परिस्थितीत रुग्णांनी आपले सांधे आणि स्नायू यांना दिवसभर काहीतरी व्यायाम होईल असे काम करावे.
यामुळे दुखणे कमी होईल. वेळोवेळी सी-रिअ‍ॅक्टिव्ह प्रोटीन (C-reactive Protein) (सिस्टमिक सूजचे सूचक) तपासणे, नियमित व्यायाम,
ओमेगा ३ समृद्ध निरोगी पदार्थ, फळे आणि भाज्या यांचे नियमित सेवन करणे.
नियमित ध्यानधारणा किंवा प्रगत औषधांचा वापर यामुळे ही समस्या बर्‍याच अंशी नियंत्रणात राहू शकते.”
हे समजून घेणे महत्वाचे आहे की एएससाठी विशिष्ट उपचार नसले तरीही, रुग्णांनी काळजी घ्यावी.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Ankylosing Spondylitis | ankylosing spondylitis do not ignore chronic back pain ankylosing spondylitis can be a problem

 

हे देखील वाचा :

Cesarean Delivery | सिझेरियन प्रसूतीनंतर पुढील Pregnancy चं नियोजन कसे कराल? जाणून घ्या

Pune Crime | एकतर्फी प्रेमातून तरुणीला अ‍ॅसिड फेकण्याची धमकी, हडपसर परिसरातील घटना

PM Kisan Samman Nidhi Yojana | पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी तयार; ‘हे’ शेतकरी ठरतील अपात्र

 

Related Posts