IMPIMP

कुटुंबीयांचा आरोप : ‘अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण मागील सरकारनं दाबलं’

by pranjalishirish
anvay-naik-suicide-case-family-allegations-against-previous-government

सरकारसत्ता ऑनलाइन – विधिमंडळात मनसुख हिरेन प्रकरण (Mansukh Hiren Death Case) गाजताना दिसलं. यावेळीच अन्वय नाईक Anvay Naik प्रकरणाचीही खूप चर्चा झाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबलं होतं, असा आरोप राज्याच्या गृहमंत्र्यांनी केला. यानंतर फडणवीसांनी चौकशीचं खुलं आव्हानही दिलं होतं. यानंतर आता अन्वय नाईक Anvay Naik यांच्या कुटुंबीयांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षाच्या भूमिकेवर टीका केली. मागील सरकारनं ते प्रकरण दाबल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आत्महत्येचं प्रकरण बाजूला राहिलं, परंतु विरोधक त्यांच्या जमीन व्यवहारांवर चर्चा करत आहे, असंही नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी म्हटलं आहे.

‘तुम्ही अंबानी असाल तरच न्याय मिळणार का ? इतरांना लगेच न्याय मिळतो’

या प्रकरणी बोलताना हिरेन प्रकरणाचा दाखल देत आज्ञा नाईक म्हणाल्या, इथं इतरांना लगेच न्याय मिळतो. केवळ संशय असला तरी लगेच (सचिन वाझे) बदल्या केल्या जातात. कारवाई होत आहे. विधानसभा हादरवली जात आहे. मग आम्हालाच न्याय का नाही मिळत. तुम्ही अंबानी असाल तरच न्याय मिळणार का, आमच्या प्रकरणात तर सुसाइड नोट आहे. मग या न्यायव्यवस्थेला काय अर्थ आहे. सुप्रीम कोर्टानं फक्त अंतरिम जामीन दिला आहे निकाल नाही. मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत.

‘आम्हाला धमक्या येताहेत, हे प्रकरण दाबलंय; मागील सरकारची चौकशी व्हावी’

पुढं बोलताना आज्ञा नाईक म्हणाल्या, आम्हाला धमक्या येत आहेत. प्रभादेवीमध्ये मारणार. बघतो तुझा व्यवसाय कसा होतो. आता कुठे खेळ सुरू झाला आहे. हे प्रकरण दाबलं हे नक्कीय. त्याची चौकशी झाली पाहिजे. मागील सरकारची पूर्णपणे चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी बोलताना केली.

‘मागच्या सरकारनं अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबलं’

अन्वय नाईक Anvay Naik यांच्या पत्नी अक्षता नाईक या प्रकरणी बोलताना म्हणाल्या, माझ्या पतीच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी सातबाऱ्याचा मुद्दा उपस्थित केला जातो आहे. जमिनी विकणं गुन्हा आहे का. तो आमचा व्यवसायच आहे. हा आमचा व्यावसायिक मुद्दा आहे. त्याचा आणि आत्महत्या प्रकरणाचा काहीही संबंध नाही. 8 वर्षांपूर्वी हा व्यवहार झाला होता. मागच्या सरकारनं अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबलं आहे. सरकारनं एसआयटी नेमायला उशीर केला आहे. पण देर आये दुरुस्त आये. आता मात्र न्याय मिळावा ही अपेक्षा आहे. गरज पडली तर नक्कीच मुख्यमंत्र्यांना भेटणार, असंही त्यांनी यावेळी सागितलं.

Alos Read :

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपूरला जाऊन घेतली सरसंघचालकांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा

Related Posts