IMPIMP

Aryan Khan Drugs Case | अखेर ‘मन्नत’ पूर्ण ! मुंबई उच्च न्यायालयाकडून आर्यन खानचा जामीन मंजूर

by nagesh
Aryan Khan Drugs Case | great relief aryan khan bail was finally granted mumbai high court in drugs case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Aryan Khan Drugs Case | मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay high court) अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) आणि मुनमुन धमेचा (Moonmoon Dhamecha) या तिघांना जामीन (Bail) दिला आहे. या सर्वांना मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) हा जामीन मिळाला आहे. या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. सर्वांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी ‘मन्नत’वर जाणार आहे.

 

आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी (Former Attorney General Mukul Rohatgi)
यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे (Senior Advocate Satish Maneshinde) न्यायालयात हजर आहेत.
तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. आज एनसीबीच्यावतीने (NCB) अतिरिक्त सॉलिसीटर जनरल (ASG) अनिल सिंग (Anil Singh) यांनी बाजू मांडली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

NCB चा युक्तीवाद

 

अनिल सिंग म्हणाले, आर्यन खान ड्रग्सचं नियमित सेवन करत होता. हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत.
आर्यनने जाणीवपूर्वक ड्रग्स बाळगले होते. दोन व्यक्ती सोबत आहेत, त्यातील दुसऱ्याला ड्रग्ज देण्यात आल्याची माहिती आहे.
त्याने ड्रेग्स घेतले तर पहिला व्यक्तीने जाणीवपूर्वक ड्रग्स बाळगले असा अर्थ निघतो.
आर्यन (Aryan Khan Drugs Case) आणि अरबाज बालपणापासूनचे मित्र आहेत. ते सोबत फिरले आणि एकाच रुममध्ये राहिले.

 

आरोपीचे वकील ड्रग्स सेवन केलं होतं की नाही स्पष्ट करण्यासाठी वैद्यकीय चाचणी का केली नाही असा युक्तिवाद करत आहेत.
परंतु आमचा आरोप सेवनाचा नाही, तर ड्रग्स बाळगल्याचा आहे. आर्यन खानने सेवनाच्या उद्देशाने ड्रग्स बाळगले.
हे प्रकरण सेवन करण्याच्या उद्देशानं जाणीवपूर्वक ड्रग्स बाळगण्याचं आहे. आरोपीकडे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्सची मात्रा सापडली.
सर्व 8 आरोपींकडे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स सापडले. याची एकूण मात्रा पाहिली असता यात व्यापक विक्रीचा कट दिसतो, असा युक्तिवाद अनिल सिंग यांनी केला.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

Web Title : Aryan Khan Drugs Case | great relief aryan khan bail was finally granted mumbai high court in drugs case

 

हे देखील वाचा :

Buldhana Crime | चक्क 10 रुपयांसाठी मित्रानेच मित्राची केली हत्या; बुलढाणा जिल्ह्यात खळबळ

Pune Crime | अनधिकृत बांधलेल्या फ्लॅटची विक्रीकरुन 47 लाखांची फसवणूक, कोंढवा पोलिसांकडून मजहर शेखला अटक

 

Related Posts