IMPIMP

Ashok Godse | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष थोर गणेश भक्त अशोक गोडसे यांचं निधन

by nagesh
Ashok Godse, President of Shrimant Dagdusheth Halwai Ganpati Trust passed away

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Ashok Godse | श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे (Shrimant Dagdusheth Halwai Ganpati Trust) अध्यक्ष अशोकराव प्रतापराव गोडसे (Ashok Godse) यांंचे सोमवार (दि. ६ डिसेंबर) रोजी सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी निधन झाले. ते ६५ वर्षांंचे होते. त्यांच्या मागे पत्नी, १ मुलगी, १ मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. यकृताच्या कर्करोगासंदर्भात त्यांच्यावर मागील दोन आठवडयांपासून ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

सुमारे ५० ते ५५ वर्षे ट्रस्टच्या माध्यमातून ते कार्यरत होते. सन २०१० पासून ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष होते. तसेच सुवर्णयुग सहकारी बँकेवर संचालक पदी देखील त्यांनी काम केले होते. अशोक गोडसे (Ashok Godse) यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या माध्यमातून मानवतेचे महामंदिर ही संकल्पना रुजवित अनेक सामाजिक उपक्रम राबविले.

 

 

जय गणेश ज्ञानवर्धन अभियान, जय गणेश रुग्ण सेवा अभियान, जय गणेश संपूर्ण ग्राम अभियान, जय गणेश आपत्ती निवारण अभियान, जय गणेश जलसंवर्धन अभियान, जय गणेश निसर्ग संवर्धन अभियान या ट्रस्टच्या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

अशोक गोडसे यांनी १९६८ साली सुवर्णयुग तरुण मंडळाचे प्रमुख संघटक म्हणून सुरुवात केली.
सन १९९६ मध्ये ते सुवर्णयुग तरुण मंडळाचे विद्यमान संचालक होते.
सन २००१ मध्ये ट्रस्टच्या विश्वस्तपदी त्यांची निवड झाली.
त्यानंतर सन २०१० मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यापासून ते ट्रस्टवर कार्यरत होते.
दरवर्षी होणा-या गणेशोत्सव सजावटीच्या संकल्पनेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

गोडसे (Ashok Godse) यांचा अंत्यविधी उद्या (मंगळवार) सकाळी 11 वाजता नवी पेठेतील वैकुंठ स्मशान भूमी येथे होणार आहे.

 

Web Title :- Ashok Godse, President of Shrimant Dagdusheth Halwai Ganpati Trust passed away

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 17 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

ITR Filing Rules For Senior Citizen | 75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांना भरावा लागणार नाही आयटीआर, जाणून घ्या नियम

Accident News | तेरवीच्या कार्यक्रमासाठी जाताना काळाचा घाला; कार पलटी होऊन मायलेकीसह वडिलांचा मृत्यू तर दोन गंभीर

 

Related Posts