IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 17 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | 12 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनावर (Pimpri Corona) नियंत्रण मिळवण्यात आरोग्य प्रशासनाला यश आले असतानाच ओमायक्रॉन व्हेरिएंटचे (Omycron variant) 6 रुग्ण शहरात आढळून आल्याने चिंता वाढली आहे. पिंपरी चिंचवड शहरात (Pimpri Corona) गेल्या 24 तासात शहरामध्ये 5 हजार 646 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 17 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 21 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

शहरात आजपर्यंत करण्यात आलेल्या 22 लाख 35 हजार 648 जणांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 2 लाख 77 हजार 722 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 2 लाख 73 हजार 603 जणांनी कोरोनावर (Pimpri Corona) मात केली आहे. सध्या शहरामध्ये 337 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून यामध्ये 213 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) मध्ये असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर 124 लोक होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत. गेल्या 24 तासात शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. आजपर्यंत शहरात 4 हजार 513 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

सोमवारी (दि.06) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 15 हजार 690 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 26 लाख 86 हजार 852 जणांना लस देण्यात आली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Pimpri Corona | Diagnosis of 17 patients of Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

ITR Filing Rules For Senior Citizen | 75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांना भरावा लागणार नाही आयटीआर, जाणून घ्या नियम

Accident News | तेरवीच्या कार्यक्रमासाठी जाताना काळाचा घाला; कार पलटी होऊन मायलेकीसह वडिलांचा मृत्यू तर दोन गंभीर

Pune Crime | पुणे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ‘पॉपी स्ट्रॉ’ ड्रग्ससह तिघांना अटक

 

Related Posts