IMPIMP

Ayodhya Trophy Summer League T20 Cricket Tournament | ‘आयोध्या करंडक’ समर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा; लिंजडस् स्पोर्ट्स क्लब, युनायटेड इलेव्हन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत!

by nagesh
Ayodhya Trophy Summer League T20 Cricket Tournament | ‘Ayodhya Trophy ‘ Summer League T20 Cricket Tournament; Leagues Sports Club, United XI teams fight for the title!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – एजीएएस मॅनेजमेंट तर्फे कै. अप्पासाहेब उभे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित ‘आयोध्या करंडक’ समर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत (Ayodhya Trophy Summer League T20 Cricket Tournament) लिंजडस् स्पोर्ट्स क्लब आणि युनायटेड इलेव्हन संघांनी अनुक्रमे डिझाईनर इलेव्हन आणि कल्याण क्रिकेट क्लब या संघांचा पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. (Ayodhya Trophy Summer League T20 Cricket Tournament)

मुकूंदनगर येथील कटारीया हायस्कुल मैदानावर झालेल्या सामन्यात रितेश साळी याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर युनायटेड इलेव्हन संघाने कल्याण क्रिकेट क्लबचा ५ गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना कल्याण क्रिकेट क्लबने १५३ धावा धावफलकावर लावल्या. रोहीत गुगळे याने ६४ धावांची खेळी केली. युनायटेड संघाच्या रितेश साळी याने २३ धावात ४ गडी बाद करून चमकदार गोलंदाजी केली. युनायटेड इलेव्हन संघाने १७.४ षटकामध्ये व ५ गडी गमावून आव्हान सहज पूर्ण केले. रितेश साळी ४९ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ६८ धावा केल्या. सागर पोरे यानेही नाबाद ४६ धावांची खेळी करून योग्य साथ दिली. या दोघांनी दुसर्‍या गड्यासाठी ७१ चेंडूत ९५ धावांची खेळी करून संघाचा विजय सोपा केला.

नचिकेत कुलकर्णी याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर लिजंडस् स्पोर्ट्स क्लब संघाने डिझाईनर इलेव्हन संघाचा
४७ धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. लिजंडस् स्पोर्ट्स क्लबने पहिल्यांदा फलंदाजी करताना १६५ धावांचे
आव्हान उभा केला. अभिषेक बोधे (३० धावा), नचिकेत कुलकर्णी (२६ धावा) आणि समीर पंचाोर (२० धावा)
यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या आव्हानाचा पाठलाग करताना डिझाईनर इलेव्हनचा डाव ११९ धावांवर
आटोपला. नचिकेत कुलकर्णी (३-२६) आणि अमित गणपुले (२-१७) यांनी अचूक गोलंदाजी करत संघाचा विजय
सोपा केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्य फेरीः

कल्याण इलेव्हनः २० षटकात १० गडी बाद १५३ धावा (रोहीत गुगळे ६४ (४३, ९ चौकार, १ षटकार), किरण दातार २५,
रितेश साळी ४-२३, प्रतिक घाटे २-२६) पराभूत वि. युनायटेड इलेव्हनः १७.४ षटकात ५ गडी बाद १५५ धावा
(रितेश साळी ६८ (४९, ८ चौकार, ३ षटकार), सागर पोरे नाबाद ४६ (३८, ६ चौकार), चिराग शेरकर ३-२७);
(भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी रितेश आणि सागर ९५ (७१); सामनावीरः रितेश साळी;

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

लिजंडस् स्पोर्ट्स क्लबः २० षटकात १० गडी बाद १६५ धावा (अभिषेक बोधे ३०, नचिकेत कुलकर्णी २६, समीर पंचाोर २०,
जगदीश सुरे ३-२३, धवल त्रिवेदी २-२१) वि.वि. डिझाईनर इलेव्हनः १९.३ षटकात ९ गडी बाद ११९ धावा
(धवल त्रिवेदी २६, जगदीश सुरे १५, नचिकेत कुलकर्णी ३-२६, अमित गणपुले २-१७); सामनावीरः नचिकेत कुलकर्णी;

Web Title : Ayodhya Trophy Summer League T20 Cricket Tournament | ‘Ayodhya Trophy ‘ Summer League T20 Cricket Tournament; Leagues Sports Club, United XI teams fight for the title!

Related Posts