IMPIMP

Pune Crime News | Wanwadi Police Station : वानवडी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून वाहन चोरांच्या मुसक्या आवळल्या, 10 वाहने हस्तगत

by nagesh
Pune Crime News | Wanwadi Police Station chased the cinestyle and caught the car thieves, 10 vehicles were seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | वानवडी पोलिस स्टेशनमधील (Wanwadi Police Station) तपास पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदारांनी वाहन चोरी (Motor Vehicle Theft) करणार्‍यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. वानवडी पोलिसांनी एकुण 3 वाहन चोरांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल 4 लख 65 हजार रूपये किंमतीची 10 वाहने हस्तगत केली आहेत. (Pune Crime News)

दिनेश रघुनाथ शिंदे Dinesh Raghunath Shinde (28, रा. मातंग वस्ती, वैद्युवाडी, हडपसर, पुणे – Hadapsar) आणि आकाश तुळशीराम ननवरे Akash Tulshiram Nanvare (25, रा. गोसावी वस्ती, हडपसर, पुणे) आणि बरकत अब्दुल शेख Barkat Abdul Shaikh (45, रा. जैन टाऊनशिप, हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे – Handewadi Road Pune) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 19 मे 2023 रेाजी वानवडी पोलिस स्टेशनमधील तपास पथकातील अधिकारी व पोलिस अंमलदार हे परिसरात पेट्रोलिंग (Police Patrolling) करीत होते.

त्यावेळी रामटेकडी इंडस्ट्रियल एरियामधील (Ramtekdi Industrial Area) रेल्वे अंडर बायपासजवळुन (Railway Under Bypass Pune) दोघे संशयितरित्या आढळून आले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी त्यांच्याकडील वाहन भरधाव चालवुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी दिनेश आणि आकाश यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी शहरातील विविध पोलिस स्टेशनच्या हद्दीतून दुचाकी वाहने चोरल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून वानवडी पोलिस स्टेशन, कोंढवा पोलिस स्टेशन (Kondhwa Police Station), खडक पोलिस स्टेशन (Khadak Police Station) आणि सांगवी पोलिस स्टेशनच्या (Sangvi Police Station) हद्दीतील 4 गुन्हे उघडकीस आणले. त्यांच्याकडून एकूण 8 वाहने जप्त करण्यात आली. (Pune Crime News)

 

आरोपी बरकत अब्दुल शेखने वानवडी परिसरातून एक यामाहा दुचाकी चोरून नेली होती.
त्यावेळी त्याने पल्सर गाडीचा उपयोग केला होता. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी त्याचा 24 तासाच्या आत
शोध घेतला आणि त्याला अटक केली. त्याच्याकडून 2 वाहने जप्त करण्यात आली.
वानवडी पोलिसांनी वाहन चोरी करणार्‍या तिघांना अटक करून त्यांच्याकडून 4 लाख 65 हजार रूपये किंमतीची 10 वाहने जप्त केली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख
(DCP Vikrant Deshmukh), सहाय्यक पोलिस आयुक्त पौर्णिमा तावरे (ACP Pornima Taware)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे (Sr PI Bhausaheb Pathare),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदिप शिवले (PI Sandeep Shivle), पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे
(PSI Santosh Sonavane), सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रासगे (Police Rasage),
पोलिस हवालदार अमजद पठाण (Police Amjad Pathan),

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पोलिस संतोष नाईक (Police Santosh Naik), पोलिस विनोद भंडलकर (Police Vinod Bhandalkar), पोलिस हरिदास कदम (Police Haridas Kadam), पोलिस अतुल गायकवाड (Police Atul Gaikwad), पोलिस
राहुल गोसावी (Police Rahul Gosavi), पोलिस संदिप साळवे (Police Sandeep Salve),
पोलिस निलकंठ राठोड (Police Nilkanth Rathod), पोलिस विष्णु सुतार (Police Vishnu Sutar), पोलिस
विठ्ठल चोरमले (Police Vittal Chormale), पोलिस अमोल गायकवाड (Police Amol Gaikwad) आणि
महिला पोलिस अंमलदार मनिषा सुतार (Police Manisha Sutar), महिला पोलिस अंमलदार सोनम भगत
(Police Sonam Bhagat) यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Wanwadi Police Station chased the cinestyle and caught the car thieves, 10 vehicles were seized

Related Posts