IMPIMP

Bank Interest Rates | सेव्हिंग अकाउंट धारकांसाठी खुशखबर, या बँकेच्या ग्राहकांना आजपासून होणार जास्त फायदा

by sachinsitapure
Bank Interest Rates | rbl bank revises savings account interest rates earn up to up to 7.5 pc interest rate

नवी दिल्ली : Bank Interest Rates | आरबीएल बँकेने (RBL Bank) आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आरबीएलने एनआरई/एनआरओ सेव्हिंगसह (Savings Account ) आपल्या बचत खात्यावरील व्याजदारात निवडक रक्कमेवर ५० बेस पॉइंट्स (BPS) पर्यंत वाढ केली आहे. बँकेकडून नवीन व्याजदर आजपासून म्हणजेच २१ ऑगस्ट २०२३ पासून लागू करण्यात आला आहे (RBL Bank Interest Rates).

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

आरबीएल बँकेच्या बचत खात्यावरील व्याजदर

बँकेकडून दैनंदिन शिल्लक असलेल्या बचत खात्यावर १ लाख रुपयांपर्यंत ४.२५% दर दिला जाईल. तर बँकेकडून बचत खात्यावर १ लाखांपेक्षा जास्त आणि १० लाखांपर्यंत ५.५०% व्याजदर दिला जाईल. याशिवाय १० लाख ते २५ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर बँकेकडून ६.००% व्याज दिले जाईल.

व्याजदरात ५० बेसिस पॉईंटने वाढ

बँकेने २५ लाखांपेक्षा जास्त दैनंदिन शिल्लक असलेल्या खात्यांवरील व्याजदरात ५० बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. रु. २५ लाख ते रु. ३ कोटी दरम्यानच्या रकमेवर व्याजदर ७% वरून ७.५०% करण्यात आला आहे. याशिवाय बँकेने डेली बेसीसवर जास्त शिल्लक असलेल्या खात्यांवर व्याजदर कमी केला आहे. ३ कोटींवरील रकमेवर व्याजदर ५० बेस पॉईंटने कमी केला आहे. म्हणजेच ३ कोटी ते २५ कोटींपर्यंतच्या रकमेवर आता ७% ऐवजी ६.५% दराने व्याज दिले जाईल. (Bank Interest Rates)

आरबीएल बँकेकडून २५ कोटी ते ५० कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेवर ६.२५% व्याज दिले जात आहे.
याशिवाय, ५० कोटी ते १०० कोटींपर्यंतच्या रकमेवर ६.००% दराने व्याज दिले जाईल. १०० कोटी ते २०० कोटी
रुपयांपर्यंतच्या रकमेवर ४ टक्के दराने व्याज दिले जाईल.

 

Related Posts