IMPIMP

Baramati Lok Sabha | आरोप-प्रत्यारोप, विखारी टीका, आता सुप्रिया सुळे अजित पवारांच्या निवासस्थानी दाखल, कार्यकर्ते, मतदारांवर कोणता परिणाम होणार, चर्चेला उधाण!

by sachinsitapure

बारामती : Baramati Lok Sabha | बारामतीत लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी बारामतीमध्ये घडत आहेत. आरोप-प्रत्यारोप, विखारी टाका दोन्ही बाजूंकडून झाल्यानंतर तसेच पैसे वाटपाचा आरोप, कार्यकर्त्याला शिवीगाळ अशी प्रकरणे आज गाजत असतानाच बारामतीच्या निवडणुकीत एक मोठा ट्विस्ट आला आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या अचानक अजित पवार (Ajit Pawar) यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी दाखल झाल्या.

दरम्यान, सुप्रिया सुळे काटेवाडीत (Katewadi) पोहचल्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या मातोश्री घरात होत्या. सुप्रिया सुळेंच्या या कृतीचे आजच्या मतदानावर, तसेच कार्यकर्त्यांवर कोणता परिणाम होणार याची चर्चा आता सुरू झाली आहे.

इंदापूरमध्ये (Indapur) नाना गवळी (Nana Gavli) या कायकर्त्याला अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपली आपबिती सुप्रिया सुळेंना सांगताना कार्यकर्ते नाना गवळी ढसाढसा रडल्याने हा राज्यभरात चर्चेचा विषय झाला असताना, सुप्रिया सुळे आज मतदानाच्या दिवशी अजित पवारांच्या निवासस्थानी दाखल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या घरी पोहोचल्या त्यावेळी तिथे अजित पवार आणि त्यांची आई आशाताई पवार होत्या. सुप्रिया सुळे तिथे का गेल्या याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. ऐकमेकांवर विखारी टीका केली. निवडणुकीत प्रचाराच्या वेळी पवार वि. पवार अशी लढाई दाखवली. मात्र ते कुटुंब म्हणून एकच आहेत. पवार कुटुंबात कोणतेच वितुष्ट नाही, हे एकत्रच राहणार असतील तर आपण कार्यकर्ते म्हणून या लढाईत सहभागी व्हायचे का? असा संदेश कार्यकर्त्यांमध्ये तसेच मतदारांमध्ये यामुळे जाण्याची शक्यता आहे.

या भेटीनंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आशा काकींना भेटण्यासाठी मी आले होते. त्यांचा आशिर्वाद घेतला. बारामतीमध्ये मतदान सुरु होऊन अवघे काही तास उलटले असताना सुप्रिया सुळे-अजित पवार यांची भेट झाल्याने त्याचा मतदानावर काय परिणाम होणार, हे आता चार जूनला समजेल.

Related Posts