IMPIMP

Baramati Lok Sabha | ईव्हीएमवर कमळंच नव्हते, पारंपारिक मतदार असलेले आजोबा भडकले, पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदान केंद्रावरील प्रकार

by sachinsitapure

पुणे : बारामतीची निवडणूक (Baramati Lok Sabha) सध्या देशात चर्चेचा विषय आहे. परंतु, रोजचे राजकारण, बातम्या यांच्याशी काहीही देणं-घेणं नसलेले ज्येष्ठ नागरिक यांचा अनेकदा यामुळे गोंधळ उडतो. बारामती मतदारसंघात यंदा भाजपाचा उमेदवारच (BJP Candidate) नाही. येथे भाजपा, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार रिंगणात आहेत, आणि त्यांचे चिन्ह आहे घड्याळ. आता भाजपाचे पारंपारिक मतदार असलेले ज्येष्ठ मतदार हे घड्याळ शरद पवारांचे समजून नेहमीच कमळाला मतदान करतात. यावेळी मात्र, उलटे घडले असल्याने अशा पारंपारिक मतदारांचा गोंधळ उडाला आहे.

असाच एक प्रकार बारामती लोकसभा मतदार संघातील पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदान केंद्रांवर घडला. येथे पारंपारिक भाजपचे मतदार असलेले एक आजोबा ईव्हीएमवर कमळाचे चिन्ह नसल्याने चांगलेच संतापले होते.

हे आजोबा मतदान केंद्रांवर आल्यानंतर त्यांनी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून मतदानासाठी गेले. मात्र त्यावेळी त्यांना ईव्हीएम मशीनवर कमळाचे चिन्ह नसल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी मतदान न करता उपस्थितांना जाब विचाराला आणि कमळाचे चिन्ह नसल्याने मतदान न करण्याचा निर्धार केला. या सर्वप्रकारामुळे काही वेळ मतदान केंद्रावर गोंधळ झाला. मात्र या आजोबांची समजूत काढल्यानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेत मतदान केले.

Related Posts