IMPIMP

Beed Crime | प्रेमाचे नाटक करुन महिला पोलीस अंमलदारावर अत्याचार, ब्लॅकमेल करत उकळले तब्बल 13 लाख

by nagesh
Pune Crime News | Sahakarnagar Police Station - Rape On Minor Girl in Annabhau Sathe Colony, Aranyeshwar

बीड : सरकारसत्ता ऑनलाइन Beed Crime | राज्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदवस वाढ होत आहे. यातच आता
एका महिला पोलीस अंमलदारावर (Woman Police Amaldar) अत्याचार करुन तिच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर
आला आहे. आरोपीने महिला अंमलदार यांच्यासोबत प्रेमाचे नाटक करून तिच्यावर अत्याचार (Physical Abuse) केले. याप्रकरणी बीडच्या शिवाजी
नगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station गुन्हा दाखल करण्यात (Beed Crime) आला आहे.

 

याबाबत पीडित महिला अंमलदार यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विनायक अनिल सवाई (Vinayak Anil Sawai) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. आरोपी विनायक याने महिला अंमलदार यांच्यासोबत प्रेमाचे नाटक करुन त्यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करुन ब्लॅकमेल (Blackmail) करत तब्बल 13 लाख रुपये उकळले. ही धक्कादायक घटना 4 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे. (Beed Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पीडित महिलेने 2020 मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घर भाड्याने घेतले आहे.
याठिकाणी ती आपली आई आणि भावासोबत राहते. याचठिकाणी तिची ओळख आरोपी विनायक याच्यासोबत झाली.
ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमसंबंध (Love Affair) निर्माण झाले.
या दरम्यान विनायक याने पैशाची गरज असल्याचे सांगितले. पीडित महिलेने एका पतसंस्थेतून दोन लाख रुपये कर्ज काढून त्याला दिले. दिलेल्या पैशांची मागणी महिलेने केली असता आरोपीने फोटो व्हायरल करण्याची धमकी (Threat) देत अत्याचार केला. फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Beed Crime | physical abused on woman police amaldar in beed know details what happened

 

हे देखील वाचा :

Heartburn | छातीत जळजळ किंवा Heartburn का होते, जाणून घ्या याची लक्षणे आणि बचावाचे उपाय

Devendra Fadnavis | खरी शिवसेना कोण हे शिंदेंनी दाखवून दिले, फडणवीसांकडून दसरा मेळाव्याचे कौतुक, उद्धव ठाकरेंना डिवचताना म्हणाले – ‘सुज्ञ लोक शिमग्यावर…’

Kidney Health | ‘या’ 5 वस्तूंपासून रहा दूर, अन्यथा किडनीचे होऊ शकते नुकसान; जाणून घ्या कसे

 

Related Posts