IMPIMP

Devendra Fadnavis | खरी शिवसेना कोण हे शिंदेंनी दाखवून दिले, फडणवीसांकडून दसरा मेळाव्याचे कौतुक, उद्धव ठाकरेंना डिवचताना म्हणाले – ‘सुज्ञ लोक शिमग्यावर…’

by nagesh
Devendra Fadnavis | devendra fadnavis special cyber prject in the state steps will be taken by the state government to crack down on pornographic disorders

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Devendra Fadnavis | शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) मेळाव्यावर आता जोरदार प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भाषणावरून दोन्हीकडील नेते आणि समर्थक टीका-टिपण्णी करत आहेत. मनसे (MNS), राष्ट्रवादी (NCP) आणि भाजपाच्या (BJP) नेते आपआपल्या सोयीच्या प्रतिक्रिया देत आहेत. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे यांना भाषणावरून डिवचताना म्हटले की, सुज्ञ लोक शिमग्यावर प्रतिक्रिया देत नाहीत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याचे कौतुकही केले. फडणवीस यांनी म्हटले की, मी दोन्ही भाषणे ऐकली नाहीत. कारण, मी धम्मचक्र प्रवर्तनाच्या कार्यक्रमात होतो. त्यानंतर, दोन्ही भाषणाचा थोडा थोडा सारांश मी ऐकला. युट्यूबवर एकनाथ शिंदेंचे भाषण बघितले. मी एवढंच सांगू शकेल, मी उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर काहीच प्रतिक्रिया देणार नाही, कारण शिमग्यावर कधीच प्रतिक्रिया द्यायची नसते. खरी शिवसेना कोणाची हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले. कारण, शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट गर्दी शिंदेंच्या मेळाव्याला होती.

 

फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले, मुंबईसह, उर्वरीत महाराष्ट्रातून कार्यकर्ते एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याला आले होते. त्यामुळे, खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच हे कालच्या मेळाव्याने दाखवून दिले.
त्यामुळे, मी मुख्यमंत्री शिंदेंचे अभिनंदन करतो. उद्धव ठाकरेंनी स्क्रीप्ट रायटर बदलला पाहिजे, दरवेळी तेच तेच..
एकतर स्क्रीप्ट रायटर बदला किंवा स्क्रिप्ट रायटरला क्रिएटिव्ह लिखाण करायला लावा.
विधानसभेवर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपच्या युतीचा भगवा फडकणारच,
असे फडणवीस म्हणाले.

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | smart people dont react on shimgya devendra fadnavis scolds uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Kidney Health | ‘या’ 5 वस्तूंपासून रहा दूर, अन्यथा किडनीचे होऊ शकते नुकसान; जाणून घ्या कसे

Health Benefits Of Peas | डोळ्यांच्या दृष्टी वाढवण्यापासून शुगरही कमी करते हिरवी मटार; जाणून घ्या 5 जबरदस्त फायदे

CNG Vs Electric Car | इलेक्ट्रिक कार खरेदी करावी की CNG? जाणून घ्या दोन्ही पैकी कोणती चांगली, कोण-कोणते आहे तोटे

 

Related Posts