IMPIMP

Bhaskar Jadhav | तुम्ही काय म्हशी भादरत होता का?, भास्कर जाधवांचा नारायण राणे आणि त्यांच्या सुपुत्रांवर घणाघात

by nagesh
Bhaskar Jadhav | bhaskar jadhav directly attacked on narayan rane from kudal made serious allegations

कुडाळ : सरकारसत्ता ऑनलाइन –  शिवसेनेच्या ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात आज (दि.18) ठाकरे समर्थक आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला होता. वैभव नाईक यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाची कारवाई सुरु आहे. त्याच्या निषेधार्थ भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यासह अनेक दिग्गजांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला. यावेळी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर टीका केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी भास्कार जाधव (Bhaskar Jadhav) यांनी नारायण राणे आणि त्यांच्या सुपुत्रांवर घाणघाती टीका केली. नारायण राणेंना गेल्या आठ वर्षात कुणी सभेसाठी बोलावले नाही. देशातील नेते आणि गल्लीतील कुत्रे देखील त्यांना विचारत नाहीत. सिंधुदुर्गातील कोंबडीवाले, बेडूक यांनी मुंबईत रे रोडला एक प्रोजेक्ट उभा केला. या प्रोजेक्टमध्ये त्यांनी 300 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार (Corruption) केला. त्यांच्या विरोधात ईडीने (ED) कारवाई करावी, यासाठी भाजपच्या किरीट सोमय्यांनी (BJP Kirit Somaiya) मागणी केली होती. आज मंत्रिमंडळात बसलेले 50 – 55 टक्के लोकांवर भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात गंभीर आरोप केले होते. तेच लोक भाजपमध्ये गेल्यावर अगदी साफ आणि स्वच्छ झाले आहेत. निरमा पावडरचा कारखानाच भाजपच्या घरात सुरु झाला आहे, असे भास्कर जाधव यावेळी म्हणाले.

 

या कोंबडीवाल्यांनी साडे अठरा वर्षांपूर्वी शिवसेना सोडली. मात्र, राणे गेली 18 वर्षे एकच बोलत आहेत,
मी शिवसेना सोडली आणि शिवसेना संपली. ते नेहमी म्हणतात, मी 39 वर्षे शिवसेनेत काम केले.
मग 39 वर्षे काय दाढ्या करत होता का?, असे भास्कर जाधव यांनी राणेंनी विचारले.
नारायण राणे उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सभा झाली की मिडियासमोर येऊन बोलतात. तसेच आज बाळासाहेब असते, तर त्यांनी राणेंना विचारले असते, की त्यावेळी अंधेरी आणि गोरेगावला म्हशींचे तबेले होते. शिवसेनेने काहीच केले नाही, मग मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेल्या तुम्ही काय म्हशी भादरत होता का?, असे देखील भास्कर जाधव म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Bhaskar Jadhav | bhaskar jadhav directly attacked on narayan rane from kudal made serious allegations

 

हे देखील वाचा :

Nitesh Rane | आमच्यावर भुंकण्यासाठी भटकी कुत्री, सोंगाडे आणले, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

MIM MP Imtiyaz Jaleel | संजय शिरसाटांना आला हृद्यविकाराचा झटका; इम्तियाज जलील यांनी सांगितले राजकारण

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंना क्रेडिट जाऊ नये म्हणूनच पवारांची पत्रकार परिषद; संदीप देशपांडेंचा आरोप

 

Related Posts