IMPIMP

Blood Sugar | मधुमेहात सर्वात जास्त प्रभावित होतात ‘हे’ अवयव, वेळेवर नाही केले नियंत्रण तर होऊ शकतात डॅमेज; जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Blood Sugar | blood sugar these organs are most affected in diabetes know how to control

सरकारसत्ता ऑनलाइन – Blood Sugar | आजच्या काळात मधुमेह (Diabetes) हा आजार खूप सामान्य आहे. बदलता आहार आणि जीवनशैलीमुळे (Lifestyle) मधुमेहाचा आजार झपाट्याने वाढत आहे. सध्या मधुमेह हा केवळ वृद्धांमध्येच आढळत नाही तर तरुण आणि लहान मुलांमध्येही दिसून येत आहे. मधुमेह हा एक असा आजार आहे जो शरीराला आतून अशक्त आणि पोकळ बनवतो. ब्लड शुगर वाढल्याने शरीरात अनेक प्रकारच्या समस्याही वाढतात. (Blood Sugar)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

भारताला मधुमेहाची राजधानी म्हटले जाते आणि इंटरनॅशनल डायबिटिज फेडरेशननुसार (international diabetes federation), 2015 मध्ये भारतात मधुमेहाचे 691 दशलक्ष रुग्ण आढळले. मधुमेहामुळे तब्येतीत काही बदल होत असतील, जसे की थकवा, त्वचेची समस्या आणि पायात बधीरपणा, वारंवार लघवी होणे, तोंड कोरडे पडणे, इत्यादी, तर ब्लड शुगरची तपासणी करून घ्यावी. (Blood Sugar)

 

मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या शरीरातील ब्लड शुगरचे प्रमाण वाढल्याने त्यांच्या शरीराच्या अवयवांवरही परिणाम होतो, काही लोक त्यांच्या आरोग्याबाबत निष्काळजी असतात, त्यामुळे त्यांच्या शरीराच्या इतर अवयवांना नुकसान होऊ लागते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

 

या अवयवांवर होतो परिणाम :

1. मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये ब्लड शुगर लेव्हल वाढली (Blood Sugar Level) तर त्याचा परिणाम 5-10 वर्षात इतर अवयवांवर होऊ लागतो.

2. शरीरातील ब्लड शुगर इन्सुलिनद्वारे नियंत्रित केली जाते, जे स्वादुपिंडाद्वारे तयार होते. जर ते जास्त प्रमाणात बनवले जाऊ लागले तर त्याचा परिणाम शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर होतो. (Blood sugar is controlled by insulin)

3. त्यामुळे किडनी (Kidney), डोळे (Eyes), पायांच्या नसांमध्ये काही बिघाड होऊ शकतो.

4. तसेच, पायात अर्धांगवायू आणि रक्ताभिसरणात बाधा येण्याचा धोका जास्त असतो.

5. यामुळे एखादी आर्टरी ब्लॉक झाल्यास हृदयविकाराचा झटका (Heart Attack)येऊ शकतो.

6. याशिवाय मेंदूला रक्तपुरवठा खंडित झाल्याने ब्रेन स्ट्रोकची (Brain Stroke) शक्यता वाढते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अशी घ्या स्वतःची काळजी :

मधुमेही रुग्णांना जीवनशैलीत बदल करावा लागेल.

अति गोड खाणे बंद करावे लागेल.

वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवावे लागेल.

याशिवाय फास्ट फूडपासून दूर राहावे.

नियमित व्यायाम करावा.

कमी कॅलरी, विशेषतः लो सॅच्युरेटेड फॅट आहारापासून दूर राहावे.

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या आहारात भाज्या, ताजी फळे, संपूर्ण धान्य, दुग्धजन्य पदार्थ आणि ओमेगा -3 फॅट्सचा स्रोत समाविष्ट केला पाहिजे.

याशिवाय फायबरचे (Fiber) अधिक प्रमाणात सेवन केल्यानेही फायदा होतो.

 

Web Title :- Blood Sugar | blood sugar these organs are most affected in diabetes know how to control

 

हे देखील वाचा :

PMC Sewage Treatment Plants (PMC STP) | ‘टँकर’ अभावी एसटीपी मधील प्रक्रिया केलेले पाणी बांधकाम साईटपर्यंत वाहून नेणे अशक्य

Mouni Roy – Suraj Nambiar Liplock | पार्टीमध्ये स्विमिंग पूलच्या किनारी सगळ्यांसमोर केलं मौनी रॉय आणि सुरज नांबियारनं LipLock; व्हिडिओ झाला व्हायरल

EPFO ने दिला इशारा, कधीही करू नका अशा चूका अन्यथा होऊ शकते पैशाचे मोठे नुकसान

 

Related Posts