IMPIMP

PMC Sewage Treatment Plants (PMC STP) | ‘टँकर’ अभावी एसटीपी मधील प्रक्रिया केलेले पाणी बांधकाम साईटपर्यंत वाहून नेणे अशक्य

व्यावसायिकांनी प्रक्रिया केलेले पाणी वापरण्यातील अडचणींबाबत मांडली पालिकेपुढे कैफियत

by nagesh
Pune PMC News | Pune Municipal Administration has made the process of TDR even easier from today; Stage no. 2 to the Commissioner and the powers of the Standing Committee to the Additional Commissioner

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन PMC Sewage Treatment Plants (PMC STP) | बांधकामांना पिण्याचे अथवा भूजल वापरण्याऐवजी महापालिकेच्या (Pune Corporation) सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील (एसटीपी प्लँन्ट) PMC Sewage Treatment Plants (PMC STP) प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याबाबत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने (PMC Water Supply Department) काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. एसटीपी प्लँन्ट पासून कामांच्या ठिकाणापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी टँकरची सुविधा नाही तसेच सर्व प्लँन्ट नदी काठावरच असल्याने शहराच्या उपनगरापर्यंत वाहतूक खर्चही परवडणारा नसल्याचे समोर आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे तसेच सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्यांची कामे सुरू असतात. यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासते. ही गरज प्रामुख्याने महापालिकेकडून होणार्‍या पाणी पुरवठ्यातून तसेच भूजलातून उपसा करून भागविण्यात येते. शहराच्या पिण्याच्या पाण्याचीही गरजही दिवसेंदिवस वाढत असताना शहरात बहुतांश ठिकाणी घरगुती वापरासाठी भूजलाचा वापर करण्यात येतो. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेउन महापालिकेने एसटीपी प्लँन्टमधून प्रक्रिया PMC Sewage Treatment Plants (PMC STP) करुन नदी पात्रात सोडण्यात येणार्‍या पाण्याचा वापर बांधकामांसाठी आणि कॉंक्रीटच्या रस्त्यांच्या कामांसाठी करण्यात यावा, असे आदेश सुमारे महिन्याभरापुर्वी काढले आहेत. परंतू याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.

 

 

यासंदर्भात पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता दांडगे यांच्याशी संपर्क साधला असता,
ते म्हणाले एसटीपी प्लँन्टमधील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा बांधकामांसाठी वापर करण्यातील अडचणी जाणून घेण्यासाठी महापालिकेचे कॉन्ट्रॅक्टर तसेच काही बांधकाम व्यवसायीकांची नुकतेच बैठक घेण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने शहरात बहुतांश टँकर व्यावसायीक पिण्याचे व स्वच्छ पाणी वाहून नेण्यासाठीच टँकरचा वापर करतात.
एस.टी. प्लँन्टमध्ये प्रक्रिया केलेल्या पाण्याची गुणवत्ता तुलनेने खराब असल्याने याच टँकरचा वापर करणे योग्य होणार नाही.
तसेच शहरातील जवळपास सर्वच एसटीपी प्लँन्ट हे नदीच्या काठावर आहेत.
येथून पाणी शहराच्या उपनगरांमध्ये ज्याठिकाणी मोठ्याप्रमाणावर विकास कामे सुरू आहेत,
त्याठिकाणी टँकरद्वारे वाहून नेणे खर्चिक आणि वेळखाउ देखिल ठरणारे आहे.
परंतू यानंतरही महापालिकेने केवळ एसटीपी प्लँन्टमधील वाहून नेण्यासाठी टँकर उपलब्ध करून दिल्यास
हे पाणी बांधकामांसाठी वापरण्याची तयारी असल्याचे बैठकीत सांगितले.
यावर वरिष्ठ स्तरावर चर्चा करून पाणी वाहून नेण्यासाठी सुलभ पर्यांयावर निर्णय घेण्यात येईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- PMC Sewage Treatment Plants (PMC STP) | Due to lack of tankers, it is impossible to carry the treated water from STP to the construction site

 

हे देखील वाचा :

Mouni Roy – Suraj Nambiar Liplock | पार्टीमध्ये स्विमिंग पूलच्या किनारी सगळ्यांसमोर केलं मौनी रॉय आणि सुरज नांबियारनं LipLock; व्हिडिओ झाला व्हायरल

EPFO ने दिला इशारा, कधीही करू नका अशा चूका अन्यथा होऊ शकते पैशाचे मोठे नुकसान

Priyanka Chopra Viral Photo | आई झाल्यानंतर प्रियंका चोप्रानं शेअर केला पहिला फोटो, सोशल मीडियावर व्हायरल झाली तिची ‘ही’ पोस्ट..

 

Related Posts