IMPIMP

Blood Sugar Control | डायबिटीजच्या रुग्णांनी ‘या’ 5 मसाल्याचे करावे सेवन, Blood Sugar राहील नियंत्रित

by nagesh
Blood Sugar Control | 5 best spices that can help to control blood sugar level naturally

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Blood Sugar Control | मधुमेहाच्या रुग्णांसाठी (Diabetic Patient) साखरेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे असते. ब्लड
शुगरची अनियंत्रित पातळी अनेक समस्यांना कारणीभूत ठरू शकते. साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सकस आहार आणि निरोगी जीवनशैली अत्यंत
आवश्यक आहे. मधुमेहाचे रुग्ण साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वयंपाकघरात असलेल्या मसाल्यांचा वापर करू शकतात. (Blood Sugar Control)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जीवनशैली आणि आहारात बदल करून मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. साखरेच्या रुग्णांनी आपल्या आहारावर कितीही नियंत्रण ठेवले तरी ते आहारात कार्बोहायड्रेट, स्निग्ध पदार्थ आणि साखरयुक्त गोड पदार्थ घेतात. अशा आहारामुळे मधुमेही रुग्णांच्या समस्या वाढू शकतात.

जर तुम्हालाही साखरेवर नियंत्रण ठेवायचे असेल तर स्वयंपाकघरात असलेल्या काही मसाल्यांचे सेवन करा. आपल्या स्वयंपाकघरात औषधी गुणधर्माने समृद्ध असे काही मसाले आहेत, जे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवतात. स्वयंपाकघरात असलेले कोणते मसाले साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी आहेत ते जाणून घेऊया. (Blood Sugar Control)

 

1. मेथीचे सेवन करा (Eat fenugreek):

स्वयंपाकघरातील मेथी दाणे साखरेच्या रुग्णांसाठी खूप प्रभावी ठरतात. मेथीमुळे पचन आणि कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी होऊन रक्ताभिसरण सुधारते. मेथीचे दाणे तुमच्या हृदयासाठी देखील फायदेशीर आहेत, ते कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करतात आणि सूज कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहेत.

 

2. तुळस देखील फायदेशीर (Basil is also beneficial) :

तुळशीचे सेवन केल्याने इम्युनिटी वाढते, तसेच शरीर मजबूत होते. पोषणतज्ञांच्या मते, मधुमेहाचे रुग्ण तुळशीच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करू शकतात. तुळशीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करू शकतात. तुळशीचे सेवन केल्याने मानसिक आरोग्यही चांगले राहते.

 

3. हळदीने करा शुगर कंट्रोल (Sugar control with turmeric)

पोषणतज्ञांच्या मते, हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन हे एक मजबूत अँटिऑक्सिडेंट आहे जे मधुमेहाच्या रूग्णांमध्ये होणार्‍या गुंतागुंतीवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी युक्त हळद शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

4. आल्याचे करा सेवन (Consume ginger):

इम्युनिटी सुधारणारे आले मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आले इन्सुलिन स्राव नियंत्रित करण्यास मदत करते.

 

5. दालचिनीचे सेवन करा (Eat cinnamon) :

दालचिनीमध्ये अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. दालचिनी टाईप-2 मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते, असे अनेक संशोधनात सांगण्यात आले आहे. सर्व औषधी वनस्पतींपैकी, दालचिनी ही सर्वात शक्तिशाली औषधी वनस्पती आहे, ज्यामध्ये मिथाइल हायड्रॉक्सी चाल्कोन पॉलिमर असते जे ग्लुकोजचे शोषण स्टीम्युलेट करते.

 

Web Title: Blood Sugar Control | 5 best spices that can help to control blood sugar level naturally

 

हे देखील वाचा :

Anil Deshmukh | अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे’

Gold-Silver Rates Today | खुशखबर ! सोने झाले स्वस्त, चांदी 339 रुपयांनी घसरली; जाणून घ्या आजचा नवीन दर

Vidyadhar Anaskar | वैकुंठभाई मेहता संस्थेचे सहकार विद्यापीठात रुपांतर होणार – विद्याधर अनास्कर

 

Related Posts