IMPIMP

Anil Deshmukh | अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे’

by nagesh
Anil Deshmukh | anil deshmukh writes letter to chief minister eknath shinde to start katol civil court

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Anil Deshmukh | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्यातील पोलीस बदल्यांची (Maharashtra Police Officer Transfer) यादी अनिल परब (Anil Parab) आपल्याकडे देत होते, असं देशमुख यांनी आपल्या जबाबात सांगितलं आहे. तसेच, अनिल परब यांनी दिलेली यादीच आपण अतिरिक्त मुख्य सचिवांना (Additional Chief Secretary) दिल्याचे देशमुखांनी सांगितलं. ईडीच्या (ED) चार्जशीटमध्ये हा जबाब नोंदविण्यात आला आहे. या धक्कादायक खुलास्यामुळे अनिल परब आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

”मला कुठल्याही व्यक्तीने यादी दिलेली नव्हती, तर अनिल परब यांनी यादी दिली होती आणि हीच यादी आपण अतिरिक्त मुख्य सचिवांना दिल्याचे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिलेल्या जबाबात सांगितलं आहे. तर, ज्या काही बदल्या झालेल्या आहेत त्यासाठीची यादी आपल्याला एका कॅबिनेट मंत्र्याने दिल्याचे चार्जशीट मध्ये सांगितले आहे. याबाबत अनिल देशमुख यांना सवाल विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी अनिल परब यांनी ही यादी दिल्याचा खुलासा केला.

दरम्यान, अनिल देशमुख म्हणाले, ”या यादीत जी काही नावे आहेत त्यांची त्यांना हव्या त्या ठिकाणी बदली करावी असे सांगण्यात आले होते.
या यादीची कुठेही नोंद नसून आलेली ही यादी आपण एसीएस खात्याला पाठविली होती.” असं म्हणाले.
तसेच, अनिल परब ही यादी कुठून आणायचे याबाबत ईडीने विचारले असता,
”परब कदाचित शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी घ्यायचे आणि त्यानंतर ही यादी मला पाठवायचे,
या यादीत आमदार त्यांच्या आवडत्या अधिकाऱ्यांची नावे अनिल परब यांच्याकडे देत त्यानंतर ही यादी तयार करुन ही यादी परब माझ्याकडे द्यायचे,”
असं अनिल देशमुखांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Anil Deshmukh | anil deshmukh big statement on maharashtra police transfer list in ed statement anil parab

 

हे देखील वाचा :

Gold-Silver Rates Today | खुशखबर ! सोने झाले स्वस्त, चांदी 339 रुपयांनी घसरली; जाणून घ्या आजचा नवीन दर

Vidyadhar Anaskar | वैकुंठभाई मेहता संस्थेचे सहकार विद्यापीठात रुपांतर होणार – विद्याधर अनास्कर

SBI Tax Saving Scheme | एसबीआयमध्ये 5 लाख गुंतवा अन् मॅच्युरिटीनंतर मिळवा 6.53 लाख रुपये; जाणून घ्या इतर सवलत

Kidney Health | किडनी निरोगी ठेवण्यासाठी स्वामी रामदेव यांनी सांगितलेल्या टिप्स करा फॉलो

 

Related Posts