IMPIMP

Blood Type and Risk of Stroke | ‘या’ ब्लड ग्रुपच्या लोकांना कमी वयात स्ट्रोकचा धोका जास्त! स्टडीत झाला खुलासा

by nagesh
Blood Type and Risk of Stroke | people with type a blood group had higher risk of strokes before age of 60 study reveals

सरकारसत्ता ऑनलाइन –  Blood Type and Risk of Stroke | तरुणांमध्ये स्ट्रोकचा धोका झपाट्याने वाढत आहे. ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या मेंदूच्या रक्तपुरवठ्यात अचानक अडथळा येतो. जेव्हा रक्तपुरवठा खंडित होतो, तेव्हा मेंदूच्या पेशी डॅमेज होतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, स्ट्रोकमुळे शरीराचा अर्धा भाग अर्धांगवायू होतो. काही प्रकरणांमध्ये यामुळे व्यक्तीचा मृत्यूही होतो (Blood Type and Risk of Stroke).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

स्ट्रोक येण्याच्या 4-5 तासांच्या आत उपचार सुरू केले तर व्यक्ती पूर्ववत होऊ शकतो. हृदयरोग किंवा मधुमेह (Heart Disease, Diabetes) असलेल्या लोकांना स्ट्रोकचा धोका जास्त असतो. आता एक नवीन अभ्यास समोर आला आहे, ज्यामध्ये असे आढळून आले आहे की A रक्तगट असलेल्या लोकांना स्ट्रोकचा धोका जास्त असतो. अभ्यासात अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेवूयात. (Blood Type and Risk of Stroke)

 

ब्लड ग्रुप आणि स्ट्रोक यांच्यातील संबंध समजून घ्या
मेडिकल न्यूज टुडेच्या मते, नुकत्याच झालेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की A ब्लडग्रुप असलेल्या लोकांना 60 वर्षापूर्वी स्ट्रोकचा धोका O ब्लड ग्रुपच्या लोकांपेक्षा जास्त असतो. ए रक्तगट असलेल्या लोकांना रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका जास्त असतो, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. अभ्यासात असेही म्हटले आहे की हे लोक त्यांचा रक्तदाब आणि हृदयाचे आरोग्य सुधारून हा धोका कमी करू शकतात. हे असे दोन रक्त प्रकार आहेत, जे स्ट्रोकशी संबंधित आहेत. याचा अर्थ असा नाही की इतर रक्तगट असलेल्या लोकांना स्ट्रोक होत नाही. कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला हा त्रास होऊ शकतो.

 

या ब्लड ग्रुपचे सर्वात जास्त रुग्ण?
या अभ्यासात आणखी एक आश्चर्यकारक बाब समोर आली आहे ती म्हणजे स्ट्रोकला बळी पडलेल्या बी रक्तगटाचे लोक जास्त आहेत. मात्र, असे नाही रक्तगटामुळे त्यांना स्ट्रोक झाला आहे. याची अनेक कारणे असू शकतात, जी व्यक्तीच्या स्थितीवर अवलंबून असतात. हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की येथे सर्व गोष्टी आयसेमिक स्ट्रोक (ischemic stroke) च्या प्रकरणांवर लागू होतात. हा लहान वयात होणारा सर्वात सामान्य स्ट्रोक मानला जातो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अशी कमी करा स्ट्रोकची जोखीम
हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज मेलिटस, हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा.
धूम्रपान पूर्णपणे सोडून द्या.
लठ्ठपणा कमी केल्याने स्ट्रोकचा धोका कमी होतो.
हेल्दी डाएट घ्या आणि नियमित व्यायाम करा.
जीवनशैलीत आवश्यक बदल करूनही हा धोका अनेक पटींनी कमी करता येतो.
कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, डॉक्टरांशी संपर्क करा.
नेहमी लक्षात ठेवा की स्ट्रोक नंतर पहिल्या काही तासांत उपचार मिळाले तर त्यास पूर्णपणे रिव्हर्स करता येऊ शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Blood Type and Risk of Stroke | people with type a blood group had higher risk of strokes before age of 60 study reveals

 

हे देखील वाचा :

Share Market | 1 वर 8 शेअरची ’भेट’, ही स्मॉलकॅप कंपनी देत आहे बंपर बोनस

Diabetes Tips | ‘ही’ भाजी पाण्यात उकळून प्यायल्याने वेगाने कमी होईल Blood Sugar, वाढेल इन्सुलिन

Multibagger Stock | याला म्हणतात मालामाल करणारा रिटर्न ! 23 वर्षात 1 लाखाचे बनवले 50 कोटी, पुढेही तेजीची शक्यता

 

Related Posts