IMPIMP

Booster Dose | भारतात बूस्टर डोस मिळणार? शास्त्रज्ञांनी केली मोदी सरकारकडे शिफारस

by nagesh
Booster Dose | coronavirus omicron patient in india now centres research body suggest booster for 40 years and above

दिल्ली : वृत्तसंस्था Booster Dose | दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमिक्रॉन व्हेरिअंटने (Omicron Covid Variant) जगभराची चिंता वाढवली आहे. नाही-नाही म्हणत कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिअंटने अखेर भारतातही शिरकाव केला आहे. काल (गुरुवारी) कर्नाटकात पहिले दोन ओमिक्रॉन (Omicron) पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभुमीवर आता भारतात बूस्टर डोस (Booster Dose) द्यावा का याची चर्चा सुरुय. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस द्यावा, अशी शिफारस शास्रज्ञांनी केंद्राला केलीय. याबाबत केंद्राकडून लवकरच आदेश जारी होण्याची शक्यता आहे. बूस्टर डोसबाबत मोदी सरकार (Modi government) काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

इन्कोसॅग (INSACOG) हे कोरोनाच्या जीनोम भिन्नतेवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय चाचणी प्रयोगशाळांचा संघ आहे.
इन्साकॉगने म्हटले आहे की, ज्या लोकांना लसीकरण केले गेले नाही,
अशा लोकांना जास्त धोका असतो आणि त्यांनी आधी लसीकरण केले पाहिजे
आणि 40 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना बूस्टर डोस (Booster Dose) देण्याचा विचार केला पाहिजे.
अशी शिफारस भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स सिक्वेन्सिंग कन्सोर्टियमच्या (इन्साकॉग) Weekly बुलेटिनमध्ये करण्यात आली आहे. (Booster Dose)

 

दरम्यान, सहव्याधी असलेल्या लोकांना बूस्टर डोससाठी प्राधान्य दिले जाऊ शकते.
देशातील साथीच्या परिस्थितीवर लोकसभेत झालेल्या चर्चे दरम्यान खासदारांनी देखील
कोरोना लसींच्या बूस्टर डोसची (Booster Dose) मागणी केली होती.
त्याच्याच पार्श्वभूमीवर ही शिफारस करण्यात आली आहे, असं इन्कोसॅगने (INSACOG) म्हटलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

Web Title :- Booster Dose | coronavirus omicron patient in india now centres research body suggest booster for 40 years and above

 

हे देखील वाचा :

Ankita Lokhande | अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या विधींना झाली सुरुवात, मराठमोळा लुकमध्ये अभिनेत्रीने शेअर केले फोटो

India First Electric Cruiser Bike | भारताची पहिली ‘इलेक्ट्रिक क्रूझर बाईक’ आणतेय स्वदेशी कंपनी, फुल चार्जमध्ये देईल 250Km पर्यंत रेंज, जाणून घ्या सविस्तर

BJP-MNS Alliance | भाजप-मनसे युती होणार? ‘तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल’ – मनसे नेते बाळा नांदगावकर

 

Related Posts