IMPIMP

Cabinet Incentive Scheme | भीम अ‍ॅप आणि रूपे डेबिट कार्डसाठी मोदी सरकारची भरीव तरतूद

by nagesh
Cabinet Incentive Scheme | cabinet approves the incentive scheme for promotion of rupay debit cards and low value bhim upi transactions

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाछोट्या व्यवहारांना चालणा मिळावी या हेतूने मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.( Cabinet Incentive Scheme) आज दिल्ली येथे झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत रूपे डेबिट कार्ड आणि भीम ऍपच्या माध्यमातून छोट्या व्यवहारांना चालना मिळावी यासाठी मोदी सरकारकडून २६०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली. ( Cabinet Incentive Scheme)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये आर्थिक व्यवहार आणि डिजीटल देवाण-घेवाण अधिक सोईस्कर व्हावेत यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ( Cabinet Incentive Scheme)

आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत २६०० कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ यामध्ये रूपे डेबिट कार्ड आणि भीम ऍप वापरणाऱ्यांसाठी इंन्सेन्टीव्ह देण्यात येणार आहे. हा फायदा P2M(पर्सन टू मर्चंट) या तत्वावर देण्यात येणार आहे.

यावेळी आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, केंद्र सरकारने रुपे डेबिट कार्ड आणि भीम अ‍ॅप वापरणाऱ्यांसाठी २६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे एमएसएमई, शेतकरी, मजूर आणि छोटे उद्योगपतींना यूपीआय पेमेंटमधून केल्या जाणाऱ्या व्यवहारावर सूट मिळणार आहे. केंद्र सरकारने डिजिटल पेमेंट्सला अधिक सुलभ आणि सोपं करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रूपे कार्ड वापरकर्त्यांना नक्की काय फायदा मिळणार?

(rupay debit card) रूपे कार्डद्वारे होणाऱ्या व्यावहारावर 0.4 टक्के इंसेटिव्ह (परतावा, Cashback) मिळेल.

भीम यूपीआयद्वारे 2000 रुपयांपेक्षा कमीच्या व्यावहारावर 0.25 टक्केंचा परतावा मिळेल.

भीम यूपीआयद्वारे इंडस्ट्रीसाठी होणाऱ्या डिजिटल व्यवहारावर 0.15 टक्केंचा परतावा मिळेल. यामध्ये इन्शुरन्स, म्यूचुअल फंड, ज्वेलरी, पेट्रोलियम प्रोडक्ट्स यांचा समावेश असेल.

याबाबत अधिक माहिती देताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की,
यूपीआय पेमेंटद्वारे होणाऱ्या ट्रांजेक्शन्सची संख्या डिसेंबरमध्ये 12 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचली होती.
ही संख्या देशाच्या एकूण जीडीपीच्या 54 टक्के इतकी आहे.
याची संख्या आणखी वाढण्यासाठी 2600 कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

 

Web Title :- Cabinet Incentive Scheme | cabinet approves the incentive scheme for promotion of rupay debit cards and low value bhim upi transactions

 

हे देखील वाचा :

Navneet Rana | खासदार नवनीत राणांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमने; म्हणाल्या…

Gram Panchayat Election | ग्रामपंचायत निवडणूकीचा खर्च सादर करा, अन्यथा अपात्रेची कारवाई…; जिल्हा प्रशासनाचा नवनियुक्त सदस्यांना इशारा

Solapur ACB Trap | 30 हजाराची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक (API), शिपाई आणि खासगी इसम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts