IMPIMP

Gram Panchayat Election | ग्रामपंचायत निवडणूकीचा खर्च सादर करा, अन्यथा अपात्रेची कारवाई…; जिल्हा प्रशासनाचा नवनियुक्त सदस्यांना इशारा

by nagesh
Gram Panchayat Election | Gram Panchayat Elections expenses should be submitted order collector office pune to sarpanch

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – जिल्ह्यात 18 डिसेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये (Gram Panchayat Election) खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रेची (Disqualification) कारवाई सुरू करण्यात येणार आहे. 20 जानेवारी 2023 पर्यंत निवडणूक (Gram Panchayat Election) खर्चाचा हिशेब सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुणे जिल्ह्यामध्ये 18 डिसेंबर 2022 रोजी 221 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका (Gram Panchayat Election) पार पडल्या. या निवडणूकीचा निकाल 23 डिसेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आला आहे. या निवडणूकीमध्ये सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या 2 हजार 74 जागांसाठी 3 हजार 532 उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. तसेच 761 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत.

 

निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या एकूण 4 हजार 293 उमेदवारांनी त्यांचा निवडणूकीच्या खर्चाचा हिशेब 20 जानेवारी 2023 पर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसिल कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह (Affidavit) जमा करणे आवश्यक आहे.
खर्चाचा हिशोब प्रतिज्ञापत्रासह सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने सुरू करण्यात येणार आहे.
त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या निवडणूकीच्या खर्चाचा हिशेब तातडीने सादर करावा,
असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे (Deputy Collector Himmat Kharade) यांनी केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Gram Panchayat Election | Gram Panchayat Elections expenses should be submitted order collector office pune to sarpanch

 

हे देखील वाचा :

Solapur ACB Trap | 30 हजाराची लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षक (API), शिपाई आणि खासगी इसम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Hasan Mushrif | चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ ऑफरबाबत बोलले हसन मुश्रीफ; म्हणाले…

Maharashtra Politics | बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रावरून ठाकरे गटातील आमदारांमध्ये नाराजी

 

Related Posts