IMPIMP

CBI ACB Trap | 1 लाखाची लाच घेताना पुण्यातील दूरसंचार विभागातील दोन बडे अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

by nagesh
Pune Crime News | SS cell of the pune police crime branch raided a gambling den in Chandannagar area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन CBI ACB Trap | कंपनी तपासणी चौकशीचा अहवाल पाठवला नसल्याने आणि तपासणी दरम्यान आढळून
आलेल्या त्रुटींबाबत डीओटी मार्फत कारवाई टाळण्यासाठी 3 लाख रुपये लाच मागून 1 लाख रुपये लाच स्विकारताना (Accepting Bribe) सीबीआयने
(CBI ACB Trap) दूरसंचार विभागातील दोन बड्या अधिकाऱ्यांना पुण्यातून (Pune Crime) अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात
आलेल्यांमध्ये सहाय्यक विभागीय अभियंता (Assistant Divisional Engineer (तंत्रज्ञान-Technology) आणि दूरसंचार विभागाचे संचालक Director of Telecommunication Department (तंत्रज्ञान) यांचा समावेश आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नरेश बडावथ Naresh Badawath (ITS, सहायक विभागीय अभियंता दूरसंचार (तंत्रज्ञान) सल्लागार कार्यालय, MH LSA, पुणे, दूरसंचार विभाग, संचार मंत्रालय, पुणे) आणि जयकुमार थोरात Jaykumar Thorat (संचालक (तंत्रज्ञान-II) सल्लागार कार्यालय, MH LSA, पुणे, दूरसंचार विभाग, संचार मंत्रालय, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. याबाबत तक्रारदाराने केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI ACB Trap ) कडे तक्रार केली होती. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना सीबीआय विशेष न्यायाधीश, शिवाजीनगर, पुणे (CBI Special Judge, Shivaji Nagar) यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना गुरुवार (दि. 22) पर्यंत सीबीआय कोठडी (CBI Custody) सुनावण्यात आली.

 

दूरसंचार विभागाचे सहायक अभियंता नरेश बडावथ यांनी तक्रारदार यांनी त्यांच्या कंपनीचा तपासणी चौकशी अहवाल (Inspection Queries Report) न पाठवल्याने आणि तपासणी दरम्यान आढळून आलेल्या त्रुंटीबाबत डीओटीची (DOT) कारवाई टाळण्यासाठी तीन लाख रुपये लाच मागितली. तडजोडीअंती दोन लाख रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी सीबीआयकडे याबाबत तक्रार केली. सीबीआयने सापळा रचून ठरलेल्या दोन लाखापैकी एक लाख रुपये लाच घेताना दोघांना अटक केली.

 

सीबीआयने बुधवारी (दि.21) सापळा रचला. नरेश बडावथ यांनी तक्रारदार
यांच्याकडून एक लाख रुपये लाच स्विकारली आणि रक्कम वाटून घेण्यासाठी
दूरसंचार विभाग संचालक जयकुमार थोरात यांना बोलावून घेतले.
दोघांनी पैसे घेतल्यानंतर सीबीआयच्या पथकाने दोघांना अटक केली.

 

सीबीआयने दोन्ही आरोपींच्या पुण्यातील घराची आणि कार्यालयाची झडती घेतली.
या झडतीमध्ये काही कागदपत्र जप्त केली आहेत.
तर नरेश बडावथ यांच्या घरातून अंदाजे 5.67 लाख रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती सीबीआयने दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- CBI ACB Trap | CBI arrest an assistant divisional engineer (technology) and director (technology) of telecommunication dept in bribery case of one lakh in pune

 

हे देखील वाचा :

Adv.Pravin Chavan | अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून केलेली नियुक्ती रद्द

Abdul Sattar On Shivsena Dasara Melava | मंत्री अब्दूल सत्तार यांचा शिवसेनेला इशारा, म्हणाले – ‘घुसून सभा घेतली तर…’, दसरा मेळाव्याच्या जागेचा वाद चिघळणार!

Maharashtra Politics | पक्षात बंडखोरी करणार्‍या शिंदे गटाची पक्षप्रमुखांनाच ऑफर; उद्धव ठाकरेंचे स्वागतच करू, पण अट एकच…

 

Related Posts